spot_img
spot_img

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय -डॉ .भास्करराव शिरोळे निघोज बसस्थानक चौकात शेतीच्या पाण्यासाठी रास्तारोको

पारनेर (जनताआवाज वृत्तसेवा):- कुकडी कालव्याचे पाणी दि . २५ ला सोडणार होते , प्रत्यक्षात काल दि ३ ला ही पाणी आले नाही . या व शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर , माझ्या नावावर शेती नसतानाही त्यांच्या प्रति असणाऱ्या तळमळीने मी आज ही लढतोय , अशी तळमळ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ . भास्करराव शिरोळे यांनी व्यक्त केली .

कुकडी कालव्या लगत असणाऱ्या निघोज परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी पिके कुकडी कालव्याचे पाणी न सुटल्यामुळे अक्षरशः करपून गेली आहे . पाणी सोडण्याच्या प्रमुख मागणी साठी परिसरातील शेतकऱ्यांनी निघोज बसस्थानकाच्या मुख्य चौकात माजी सरपंच ठकाराम लंके यांच्या नेतृत्वाखाली दोन ते तीन तास रोको केला . यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .

यावेळी बोलताना डॉ शिरोळे पुढे म्हणाले की , या कुकडी कालवा पाटाच्या असतारी करणाची गरज , ही फक्त पारनेरकरांनाच आहे का ? सोलापूरच्या करमाळ्या पर्यंत पाणी नेण्याची ही धडपड आहे , असा आरोप ही डॉ . शिरोळे यांनी केला .

माजी सरपंच ठकाराम लंके म्हणाले की , १५ दिवसांपूर्वी आम्ही शिष्टमंडळा सोबत अधिकाऱ्यांना पाणी सोडण्या संदर्भात निवेदन देत चर्चा केली व त्वरीत पाणी सोडण्याची मागणी केली होती . आम्ही दि . १ रोजी पाणी सोडण्याची मागणी केली असता , अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणीचे कारण सांगितले . आम्हां ला निवडणूकां साठी राजकारण करायचे नाही , जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका ही एक वर्षे पुढे ढकलल्या आहेत . त्यासाठी हे आंदोलन नाही . कुकडी कालव्याचे पाणी जेवढे उशिरा येईल . तेवढे कांदा व इतर पिकांना त्याचा फटका बसणार आहे . आम्ही निघोज परिसरातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन करत आहोत , त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत , हा मुख्य उद्देश आहे .

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर म्हणाले की , पाण्याचे रोटेशन हिवाळ्यात दोन व उन्हाळ्यात शेतीसाठी एक व पिण्याच्या पाण्यासाठी असे दोन , असे एकूण ४ पाण्याचे आवर्तन सोडले जाते . लिकेज थांबवण्यासाठी पाटाचे अस्तारी करण चालू आहे . त्याची खरी गरज होती का ? कांदा पिक जगावण्यासाठी ८ दिवस अगोदरच पाणी सोडायला हवे होते , पाणी उशिरा सोडल्यास कांदा पिक पुर्णपणे करपून जाईन . अशा वेळी त्या पाण्याचा काहीही उपयोग नाही . पालकमंत्री हेच जलसंपदा मंत्री आहेत , त्यांनी पाण्याची तारीख लांबवायला नको होती . पाणी प्रश्न हा शेतकऱ्यांच्या जीवा भावाचा पाणी प्रश्न असून शेतकरी हा आशावादी आहे . या वर्षी कांदयाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे , पण कांदयाला योग्य भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ यायला नको होती . पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्याने शेती मालाला पाणी देणे शक्य नाही . दि . ५ ला सोडलेले पाणी दि . ८ ला आपल्याला मिळेल . विहिरी भरण्यासाठी ५ दिवस लागतील , अशी खदखद ही सभापती रासकर यांनी व्यक्त केली .

यावेळी हभप पवन महाराज तनपुरे , अनंतराव वरखडे , दिलीप ढवण , बाळासाहेब लंके व इतरांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले . यावेळी पांडुरंग कृपा पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत लंके , शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख महेंद्र पांढरकर , श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे सहसचिव विश्वासराव शेटे , धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष पहिलवान सुभाष वराळ , दिलीप लाळगे , शांताराम लाळगे , दिगंबर लाळगे , भिवा रसाळ , भास्कर पठारे , हनुमंत रासकर , चेअरमन सुनिल वराळ , व्हाईस चेअरमन संतोष लामखडे , ग्रामपंचायत सदस्य शंकरराव गुंड , शंकरराव वरखडे , व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या आंदोलनाचे सुत्रसंचालन पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे यांनी केले .

पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव डेरे म्हणाले की , या कुकडी कालव्या च्या पाण्यावर पारनेर तालुक्यातील साडे चौदा हजार एकर क्षेत्र ओलिता खाली येते , पण प्रत्यक्षात निघोज परिसरातील साडे तीन हजार एकर क्षेत्रांसाठी पाण्याची मागणी आहे , या पाण्याचे नियोजन करण्यासाठी १५ पाणी वापर संस्था असून त्यातील फक्त ३ संस्थांनी पाणी पट्ट्या भरल्या . शेतकऱ्यांनी पाणी मागणी करा , पण त्यासाठी पाणी पट्टी ही वेळेवर भरा . त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मागण्याची गरज ही राहणार नाही , असे ही चेअरमन डेरे म्हणाले . 

कुकड़ी कालव्या चे अधिकारी खाडे यांनी या शेतकऱ्यांच्या रस्ता रोको आंदोलना च्या संदर्भात दुरध्वनी वरून वरिष्ठांशी संपर्क साधला , त्यांना या आंदोलना ची माहिती दिली . व लवकरात लवकर पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने हे रस्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!