spot_img
spot_img

संगमनेरला उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज. महाराजस्व समाधान शिबिर’ आ. अमोल खताळ यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप होणार 

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा) : – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्त शुक्रवार,३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १०वाजता ‘अमोल खताळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 

मालपाणी लॉन्स या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात उत्पन्न,जात, रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, नॉन-क्रीमी लेयर, जन्म-मृत्यू दाखले, विविध सामाजिक न्याय, महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, कामगार, दिव्यांग कल्याण, शैक्षणिक शिष्यवृत्ती, संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना, बांधकाम कामगार नोंदणी, कृषी योजनांची माहिती, शासनाच्या विविध कल्याण कारी योजना तसेच नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामांशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय विविध विभागांच्या योजनांबाबत मार्गदर्शन व आवश्यक कागदपत्रांची माहितीही नागरिकांना दिली जाणार आहे.

शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांची शासकीय कामे सुलभ व्हावीत, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व लाभार्थी, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध योजनांसाठी पात्र लाभार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!