नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा):- शालेय विभागस्तर क्रिकेट स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती पब्लिक स्कूल,त्रिमूर्तीनगर,नेवासा येथील १९ वर्ष मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे,अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा कार्यालय अहिल्यानगर तसेच त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमूर्ती पब्लिक स्कूल, त्रिमूर्तीनगर,नेवासाफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय पुणे विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धा दिनांक १८ ते १९ ऑक्टोबर २०२६ रोजी १९ वर्ष मुले व मुली यांच्या स्पर्धा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमूर्ती शैक्षणिक व क्रीडा संकुल नेवासाफाटा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती पब्लिक स्कूल त्रिमूर्तीनगर नेवासा येथील १९ वर्ष मुलांच्या क्रिकेट संघाने पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड संघांना पराभूत करून दणदणीत असा विजय संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.विजयी खेळाडूंना त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे विश्वस्त चेतन चव्हाण पाटील, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक व चषक देण्यात आले.
तसेच ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी व पंच प्रमुख अजय कविटकर , नीलेश जरे , विशाल शिंदे , शैलेश दाने, निवड समिती प्रमुख कुलदीप देशमुख, सचिन कांबळे यांनी मोलाचे योगदान दिले. त्रिमूर्तीच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी पुणे विभागात आपला डंका गाजवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान देखील मिळवला आहे. दिनांक २१ ते २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेत्या संघातील खेळाडू पुढील प्रमाणे.
इघे प्रेम किरण, सुंटले वेदांत दिनेश, मोरे ऋषभ रविंद्र, शेख रोमन अनिस,मुल्ला निहाल इस्माईल, मडके अर्जुन दादासाहेब, भोगाडे आदिराज करण, सावंत आर्यन समीर , शेंडकर शिवराज आप्पासाहेब, शिंदे आदित्य उमेश,भालेराव निखिल अनिल, शेळके आकाश बळीराम, हत्ते भाविक रमेश,मोहिते ओंकार विलास, गारुळे कृष्णा सुनिल, बागवान सईद शमशोद्दीन
यशस्वी संघातील विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रशिक्षक समीर पठाण , शैलेश दाने यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
तसेच त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे क्रीडा समन्वयक संभाजी निकाळजे,त्रिमूर्ती पब्लिक स्कूल चे क्रीडा प्रमुख अशोक पानकडे, अभिजीत दळवी, महादेव काकडे, छबुराव काळे, संदीप वाघमारे,राहुल शेळके, निलेश पैठणे, अमीर शेख,आसिफ शेख, इमरान खान,गणेश शिंदे, साहेबराव दाने, विजू गायके, गर्जे सर , बाळासाहेब गोरे यांचे सहकार्य लाभत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा ॲड सुमतीताई घाडगेपाटील, उपाध्यक्षा ॲड स्नेहल चव्हाणे -घाडगेपाटील, सहसचिव डॉ. श्रुती आमले पाटील, विश्वस्त चेतन चव्हाणपाटील, संस्थेचे CEO डॉ.गौरव आमले पाटील ,प्राचार्य सोपानराव काळे , प्राचार्या दीपाली बाविस्कर, क्रीडा समन्वयक व राष्ट्रीय पंच संभाजी निकाळजे , विभाग प्रमुख संतोष राऊत व सर्व विभागप्रमुख, शिक्षक यांनी अभिनंदन करून शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




Total Users : 666620