राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुक्यातील साकुरी गावामध्ये बिबट्याच्या पिलांसह मुक्त संचार बघायला मिळत आहे मागील एक महिन्या पासून बिबट्या नर मादी सह २ पिलांसह साकुरी मध्ये बिबट्याने मुक्काम ठोकला आहे साकुरी गावातील बावके वस्ती परिसर,दहेगाव रोड, उपासनि महाराज मंदिर परिसरात या बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री च्या वेळी शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकांना पाणी भरण्या साठी शेतामध्ये जावे लागते परंतु मागील एक ते दीड महिन्या पासून साकुरी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे शेतकरी सुद्धा भयभीत झालेले आहे आपली जनावरे या बिबट्यांची भक्षक बनू नये म्हणून शेतकऱ्यांना रात्र रात्र जागून काढावी लागत आहे तरी सदरील बिबटे पकडण्यासातगी वनविभागाने पिंजरे लावावे अशी मागणी शेतकर्या मधून होत आहे
माझ्या मालकीच्या शेता मध्ये दिवसा लाईट नसते त्यामुळे सोयाबीन पिकाला पाणी देण्यासाठी मला रात्री जावे लागते परंतु मागील 1 महिन्यापासून बिबटे हे आमच्या शेताच्या आसपास ठाण मांडून असल्यामुळे आम्ही भयबीत आहोत तरी त्यांचा बंदोबस्त वनविभागाने करून आम्हाला भय मुक्त करावे अशी आमची मागणी आहे-विक्रांत दंडवते(शेतकरी)