लोणी दि.२( जनता आवाज वृत्तसेवा):-राज्य शासनाच्या वतीने महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मादर्शानाखाली १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या काळवधीमध्ये महसूल सप्ताह २०२३ निमित्त भूमी अभिलेख विभाग , राहाता यांचेतर्फे आय टी आय कॉलेज लोणी येथे आयोजित “युवा संवाद “ कार्यक्रमांतर्गत रोवर मशीन द्वारे करण्यात येणाऱ्या जमीन मोजणी कामाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी उपग्रहाद्वारे करणेत येणाऱ्या जमीन मोजणी विषयी विद्यार्थ्यामध्ये कुतूहल आढळून आले.
यावेळी नायब तहसिलदार रावसाहेब ओहोळ,आय.टी आयचे प्रा.दिलीप म्हस्के,दिलीप मांढरे,निर्मला मांढरे आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.
भूमी अभिलेख विभाग , राहाता यांचेतर्फे महसूल सप्ताह २०२३ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले आहे . यामध्ये स्वामित्व योजना अंतर्गत गावठाणातील मिळकतींचे सनद वाटप कार्यक्रम दि ०३ ऑगस्ट २०२३ पासून करणेत येणार आहे .या अंतर्गत दि ३ ऑगस्ट रोजी हसनापूर व दि ४ ऑगस्ट रोजी दहिगाव कोऱ्हाळे येथे कॅम्प चे आयोजन केले आहे.भूमी अभिलेख विभागातर्फे महाभूमी पोर्टल द्वारे देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती नागरिकांना माहिती फलकाच्या आधारे देण्यात येत आहे . तसेच ई मोजणी या आज्ञावली द्वारे नागरिकांना कार्यालयात न येता आॅनलाईन अर्ज करणेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करणेबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
भूमी अभिलेख विभागातर्फे विविध कायदेशीर कामांसाठी देण्यात येणाऱ्या अभिलेखांच्या नकला कार्यालयात न येता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . १ ऑगस्ट २०२३ पासून वारस नोंदीसाठी फेरफार अर्ज कार्यालयात न येता ऑनलाईन स्वरूपात करणेची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे .मा महसूल मंत्री यांचे मार्गदर्शनातून भूमी अभिलेख विभागात विविध योजना राबविण्यात येत असून त्याद्वारे नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत . सर्व नागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन राहाता येथील उप अधीक्षक भूमि अभिलेख डॉ योगेश थोरात यांचेद्वारे करण्यात आले आहे .




Total Users : 625299