लोणी दि.१५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चिंचोली येथील प्रवरा फार्मसी महिला महाविद्यालयांच्याच्या वतीने इको फ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉप सोबतचं स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष फार्मसी च्या विद्यार्थिनीनी ह्यात सहभाग नोंदवला अशी माहीती प्राचार्या डाॅ.चारुशिला भंगाळे यांनी दिली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बेसिक ते संपूर्ण गणेश मूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन सिन्रर येथील आर्ट डिझायनर सौ. पुष्पा पाटील यांनी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले महाविद्यालयातर्फे सहभागी झाल्या बद्दल सर्वांना प्रमाणपत्रही देण्यात आले. विद्यार्थ्याचा मोठा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला असून स्वता: तयार केलेल्या मुर्तीची स्थापना विद्यार्थी करणार आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. चारुशीला भंगाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.नेहा कडभाने, तसेच प्रा. संगीता भंडारे प्रा. ऋतुजा पगारे यांनी परिश्रम घेतले.