30.3 C
New York
Tuesday, July 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

आश्वी खुर्द येथील विद्यानिकेतन चे राज्यस्तरीय ड्रॉपरोबॉल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविले यश

आश्वी दि.१५ ( जनता आवाज  वृत्तसेवा):- लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी नायगाव जि. सातारा येथे संपन्न झालेल्या १४ व्या राज्यस्तरीय ड्रॉपरोबॉल स्पर्धेत विवीध बक्षिसे विद्यार्थ्यानी प्राप्त केली अशी माहीती प्राचार्य सयाराम शेळके यांनी दिली.

या स्पर्धेत ज्युनियर गटात चि. पृथ्वीराज क्षिरसागर याने सिंगल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळविले, चि. अभिनव डहाळे याने ट्रिपल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले, ज्युनियर मुली गटात कु. गंभीरे शेडळ, कु. तेजल गंभीरे व वैष्णवी जेडगुले यांनी ट्रिपल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले , तसेच सब ज्युनियर मुली गटाच्या स्पर्धेत कु. रुपाली शेंडकर व कु समिक्षा मुन्तोडे यांनी डबल इव्हेंट मधे द्वितीय पारितोषिक व सिल्व्हर मेडल मिळवले, ज्युनियर मुले गटात चि. विवेक वर्पे याने सुपर सोलो इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले, चि. ओमकार म्हस्के याने ट्रिपल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड मेडल मिळवले तर चि. प्रसाद लावरे याने डबल इव्हेंट मधे द्वितीय पारितोषिक व सिल्व्हर मेडल मिळवले, या स्पर्धेतील सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर रसाळ सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे दत्तात्रय गाडेकर प्राचार्य सयराम शेळके , उप मुख्याध्यापिका सौ. अलका तांबे, पर्यवेक्षिका सौ. माधुरी सातपुते व शिक्षक- शिक्षकेतरांचे मार्गदर्शन लाभले आहे.या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील खा. सुजय विखे पाटील जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे शिक्षण समन्वयक प्रा.एन.डी दळे, आदिनी खेळाडुंचे अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!