27 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रवरेतील आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेला मोठा प्रतिसाद

लोणी दि.१५( जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय, आश्वी खुर्द, आयोजित सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ पुणे अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धा लोणीच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कुल या ठिकाणी संपन्न झाल्या.या स्पर्धेसाठी संपूर्ण जिल्ह्यातील स्पर्धकांनी उत्स्पुर्तपणे सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सह सचिव भारत पाटील घोगरे यांचे शुभहस्ते तसेच संस्थेचे अतांत्रिक विभागाचे प्रमुख मा. डॉ. प्रदीप दिघे सर यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, डॉ. संजय गुल्हाने, डॉ. संजय भवर, डॉ. राजेंद्र देवकाते, डॉ. राम पवार प्रा. संजय शिंदे आदी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. प्रमोद विखे यांनी केले आणि महाविद्यालयाचे कँपस डायरेक्टर डॉ. राम पवार यांनी आभार व्यक्त केले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कर्नल शेखर जोशी कमांडंट सैनिक स्कुल, लोणी व प्राचार्य गाढवे यांच्या मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे पंच म्हणून प्रा. रमेश दळे, अकिल शेख, समीर विखे, अजय सिंग, संतोष घोलप, प्रतिक दळे तर लाईफगार्ड म्हणून अविनाश चेचरे व संदीप इघे यांनी काम पाहिले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!