spot_img
spot_img

गोदावरी नदीतील दीड टि.एम.सी. क्षमतेच्या उच्च स्तरीय बंधा-यास मंजुरी                                        वैजापूर, श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना मिळणार लाभ

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – गोदावरी नदीपाञातील शनि देवगाव येथील उच्च स्तरीय बंधा-यास मंञी मंडळाने नुकतीच मंजुरी दिली असून यासाठी २८५ कोटी ६४ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती वैजापूरचे आ.रमेश बोरणारे यांनी दिली. 

या बंधा-यामुळे वैजापूर व श्रीरामपूर तालुक्याला लाभ मिळणार आहे. सदरचे वृत्त समजताच गोदाकाठच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. याबद्दल अधिक माहिती देताना आ.बोरणारे यांनी सांगीतले की, देवगाव (शनि) ता.वैजापूर येथे गोदावरी नदीवर होणाऱ्या दीड टि.एम.सी. क्षमतेच्या उच्च स्तरीय बंधा-याचा वैजापूर व श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठाच्या गावांना लाभ होणार आहे. या बंधा-यास मंजुरी मिळण्यासाठी आपण पाठपुरावा केला होता, अखेरीस यश आल्याचे आ.बोरणारे यांनी सांगीतले.

दीड टि.एम.सी. साठवण क्षमतेच्या या उच्चस्तरीय बंधा-यामुळे  श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण, खानापूर, कमालपूर, महांकाळवाडगाव तसेच वैजापूर तालुक्यातील शनि देवगाव, चेंडूफळ, बाजाठाण, हमरापूर, अव्वलगाव,  नागमठाण, चांदेगाव, डागपिंपळगाव आदी गावांना लाभ होणार आहे. त्यामुळे या भागातील शेतीला संजीवनी मिळणार असून पाटपाण्यापासून वंचित गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

सदरचे काम मंजूर केल्याबद्दल आ.बोरणारे यांचे अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी अभिनंदन केले. तसेच संबंधित गावांच्या लाभधारक ग्रामस्थांनी  आ.बोरणारे यांचा शनी देवगाव येथे सत्कार केला. या सत्कार प्रसंगी रामदरबार आश्रमचे ह.भ.प.हरिशरणगिरी महाराज (बाजाठाण), शिवगिरी आश्रमचे ह.भ.प.संदीपान महाराज (बाजाठाण), श्रीरामपूर मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे, वैजापूर मार्केट कमिटीचे संचालक प्रवीण पवार, शनि देवगावचे सरपंच संजय मेघळे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, उप तालुका प्रमुख सोमनाथ भराडे, गिरीधर आसने, उत्तमराव बनसोडे, मधुकर बनसोडे, संजय बोरनारे, दिनकर बनसोडे, गंगाधर बनसोडे, सुभाष भराडे, दादा पाटील, राजूभाई काझी, विजय पाटील, मदन पवार, दीपक बारस्कर, शिवनाथ आव्हाड, विजय बनसोडे, अजय वाकचौरे आदींसह भामाठाण, खानापूर, कमालपूर, शनी देवगाव, बाजाठाण, नागमठाण, महांकाळवाडगाव, अव्वलगाव, चेंडूफळ, हमरापूर आदी गावातील लाभधारक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!