लोणी दि.२० ( जनता आवाज वृत्तसेवा ):-महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला व माननीय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे दि. 21 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2023 या काळावधीत आयोजन करण्यात आले आहे.अशी माहीती प्राचार्य बी.बी.अंबाडे यांनी दिली.
शालेय ते महाविद्यालयीन पातळीवरील मुला-मुलींच्या उपजत कला व क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळावे आणि स्थानिक नागरिकांचे आपल्याच मुलांच्या विविध कलागुणांतून मनोरंजन व्हावे, या उद्देशाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,माजी मंत्री श्री.आण्णासाहेब म्हस्के पाटील,पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री.कैलास तांबे पाटील व व्हाईस चेअरमन श्री.सतीश ससाणे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी विविध कला गुणदर्शन कार्यक्रम सादर होणार आहे. यात प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय, ब्रिलियंट बर्डस स्कूल, प्रवरा पदवी व पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय,प्रवरा ग्रामीण वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रवरा माध्यमिक विद्यालय-दुर्गापुर इ. शाखांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तर 22 सप्टेंबर 2023 रोजी प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय बाभळेश्वर, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
प्रवरानगर,महात्मा गांधी विद्यालय मुले प्रवरानगर, प्रवरा पॉलिटेक्निक महाविद्यालय लोणी,इ. शाखांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तर दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी प्रवरा कन्या विद्यामंदिर लोणी, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणी, प्रवरा औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणी, पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय प्रवरानगर, यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.यामुळे रसिकांसाठी भरघोस अशी मनोरंजनाची मेजवानी उपलब्ध होणार आहे. यासोबतच क्रीडामहोत्सवात माध्यमिक,उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन गटात हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. दि. 23 व 24 सप्टेंबर 2023 रोजी भगवती माता विद्यामंदिर व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोल्हार या ठिकाणी सदर स्पर्धा आयोजित केलेली आहे. दिनांक 25 व 26 सप्टेंबर 2023 रोजी प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी या ठिकाणी खो-खो स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तसेच दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी खुलागट शूटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन पद्मभूषण विखे पाटील प्रतिष्ठान लोणी या ठिकाणी होणार आहे.
गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर सत्यनारायण महापूजा व श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव 2023 या कार्यक्रमाचा परिसरातील सर्व रसिक,प्रेक्षक व क्रीडाप्रेमींनी आस्वाद घ्यावा, व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे व प्रवरा पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.व्ही.आर राठी यांनी केले आहे.



