लोणी दि.२०( जनता आवाज वृत्तसेवा ):लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या शुभम अनाप व कोमल जाधव या विद्यार्थ्यांची फोर्विया हेला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या बहुराष्ट्रीय कंपनीत ६.५ लाखांच्या पगारावर निवड झाली अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.
विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांत पदार्पण केले आहे. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयक डॉ. आण्णासाहेब वराडे यांनी सांगितले की, पुणे येथील फोर्विया हेला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या बहुराष्ट्रीय कंपनीने प्रवरा अभियांञिकी महिविद्यालयाचे हे सलग द्वितीय वर्षी ही परिसर मुलाखतीसाठी पसंती दिली आहे. फोर्विया हेला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीतर्फे श्री सर्वेश चोळके, हेड एच आर, फोर्विया हेला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि कंपनीचे प्रतिनिधी श्री. मंगेश खरे, श्री. राजेश रंजन, श्री तुषार दोडे व श्रीमती सनिता उगले यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थांच्या मुलाखती घेतल्या.श्रीमती सनिता उगले या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी बॅच २००२चे माजी विद्यार्थीनी आहेत.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील आतापर्यंत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने अनेक नामांकित राष्ट्रीय व बहराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून महाविद्यालयाच्या ३५० हून अधिक विद्याथ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांत १२.४८ लाखांपर्यंतच्या पगाराच्या नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. सदर इंटरव्ह्यू डॉ विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज अहमदनगर येथे प्रा. सुदर्शन दिवटे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या विभागप्रमुख प्रा. सीमा लव्हाटे व ईटीसी विभागाचे प्रा.राहुल कडू यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राज्याचे महसूल ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, डॉ विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज अहमदनगर येथील प्राचार्य डॉ उदय नाईक,
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे, प्रा. सुदर्शन दिवटे, डॉ संजय कुरकुटे,सर्व विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.
6.5 लाखांच्या पॅकेजसह फोर्विया हेला इंडिया प्रा. ली. मध्ये प्लेसमेंट मिळाल्याने मला आनंद होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागद्वारे प्रदान केलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या गुणवत्तेचा हा पुरावा आहे.माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक अत्यंत ज्ञानी आणि सहाय्यक आहेत. आमची क्षमता एक्सप्लोर करण्यासाठी आणि आमच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ते आम्हाला सतत प्रोत्साहन देतात. वास्तविक-जगातील कौशल्ये विकसित करण्यासाठी शिकण्याचा व्यावहारिक दृष्टीकोन अमूल्य आहे. महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल नामांकित कंपन्यांना आमच्या कॅम्पसमध्ये आणण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. ते विस्तृत प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू आणि करिअर मार्गदर्शन देतात, ज्यांनी माझ्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली…
…(शुभम अनाप)



