अहमदनगर ( जनता आवाज वृत्तसेवा :- महाविजय 2024 लोकसभा विजय यात्रेच्या निमित्ताने भाजपा पक्षाच्या वतीने घर चलो अभियान राबविण्यात येत असून या अभियाना अंतर्गत अहमदनगर शहरात माणिक चौक ते तेलखंडी याभागात भाजप प्रदेशध्यक्ष आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व खा.डॉ.सुजय विखे पाटील, प्रदेश महामंत्री श्री विजय चौधरी, आ. प्रा.राम शिंदे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अश्विनीताई थोरात यांच्या उपस्थितीत घर चलो रॅली काढण्यात आली.
या रॅली दरम्यान या परिसरातील घरोघरी तसेच दुकानात जावून प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. सुजय विखे यांनी जावून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी नागरिकांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दिला असून केलेल्या निर्धारास कायम राहू असा शब्द दिला.
या घर चलो रॅली पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 105 वा मन की बात कार्यक्रम माणिक चौकात सर्व नागरिकांसह प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, खा.विखे, महमंत्री विजय चौधरी यांच्यासह मान्यवरांनी पाहिला.
या कार्यक्रमा नंतर शहर भाजपच्या वतीने बावनकुळे, खा. विखे यांचा सत्कार करण्यात आला.
या घर चलो रॅलीस शहरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




Total Users : 625587