6.8 C
New York
Thursday, November 28, 2024

Buy now

spot_img
spot_img

काळे परिवाराने रयतलाच आपले कुटुंब मानले – सौ.चैतालीताई काळे

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आपले गुरु मानले होते. त्यामुळे गुरूला दिलेला शब्द प्रमाण मानून कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या प्रसारात भरीव योगदान दिले आहे. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काळे परीवाराची तिसरी पिढी देखील तो वसा पुढे चालवीत असून काळे परिवाराने रयतलाच आपले कुटुंब मानले असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी केले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील चितळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३६ वा जयंती सोहळा जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर चौधरी होते. यावेळी त्यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन, निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले व स्मार्टबोर्ड चे उद्घाटन करण्यात आले.

पुढे बोलतांना सौ.चैतालीताई काळे म्हणाल्या की, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच बौद्धिक व सामाजिक ज्ञान असणे देखील गरजेचे आहे. वक्तृत्व कौशल्य जोपासून स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. मोबाईलमध्ये स्वत;ला जास्त गुंतवून न घेता मोबाईल पासून दूर राहून आवश्यक तेवढाच मोबाईलचा वापर करावा. शाळेत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत सहभागी होवून आपल्यातील कौशल्य विकसित करावे. यश मिळविण्यासाठी परिस्थितीची अडचण येत नाही परिस्थितीचा बाऊ करू नका. ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात पुढे असून शिक्षक आपल्या भविष्यासाठी बोलत असतात हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी मनातले बोलले पाहिजे व मनाने खंबीर झाले पाहिजे असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधत शाळेचे माजी विद्यार्थी रावसाहेबजी चौधरी, आनंद चौधरी, गोरक्षनाथ वाघ, विलास वाघ, सौ. प्रतिभा तनपुरे, चंद्रकांत चौधरी, बापू चौधरी, राजेंद्र चौधरी, प्रकाश मरकड यांनी शाळेला डेस्क भेट दिले. यावेळी उत्तर विभाग,सल्लागार समिती सदस्य रमेश शिंदे, सुप्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. मोहनराव सांगळे, प्रकाश उशीर, दिलीप चौधरी, गणेश कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी, शंकरनाना चौधरी, दिपक वाघ, अशोक वाघ, सौ. वर्षा वाघ, जळगावचे सरपंच शिवाजी साबदे, उपसरपंच सौ. कल्पना चौधरी, सोपानराव वाघ, नितीन वाकचौरे, मच्छिन्द्र चौधरी, रुपेश गायकवाड, एल.आर. गायकवाड, मेजर अरुण टिळेकर, मुख्याध्यापक धोत्रे, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अरुण रुपवते यांनी केले तर आभार अझीम मिर्झा यांनी मानले.

मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे सकाळी कार्यक्रम सुरु झाल्यानंतर ढगाळ वातावरण होते. परंतु काही वेळातच कडक ऊन पडले होते. सर्व विद्यार्थी उन्हात बसलेले पाहून सौ.चैतालीताई काळे यांनी देखील स्टेजवरून उतरून उन्हातच विद्यार्थ्यांशी संवाद साधत साधेपणा जपला.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!