कर्जत ( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चार कोटी रूपयांच्या रस्ते तसेच विविध विकास कामाचा शुभारंभ उद्या दि. २७सप्टेंबर २०२३ रोजी अहमदनगरचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व आ.प्रा.राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यात प्रामुख्याने कर्जत तालुक्यातील दुरगांव येथील दुरगांव ते सोनाळवाडी या ३० लक्ष रुपये खर्चून बांधण्यात येणार्या रस्त्याचा समावेश असून २५१५ या योजनेतुन पाच लक्ष रूपयांचा निधी खर्चून दुरगांव ग्रामपंचायत समोरील मोकळया जागेवर पेव्हर ब्लॉक बसविणे या कामाचा ही यात समावेश आहे. तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मांदळी-निमगांव गांगर्डा-जिल्हा हदद या ५ कि.मी. रस्त्यासाठी ३ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजुर झाले असून या कामाचाही शुभारंभ करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी संगितले.
याच दिवशी कुळधरण येथे महसुल मंडळातील शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्र व प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.
दरम्यान हा निधी मंजुर करून देण्यासाठी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग, मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस, मा.श्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री मा.श्री. गिरीष महाजन व जिल्याचे पालकमंत्री मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निधी मंजुरीसाठी मोलाचे सहकार्य लाभले तसेच अहमदनगरचे विकासप्रिय दबंग खासदार डॉ. सुजय विखे यांनी अहोरात्र मेहनत घेवून हा निधी मंजूर करून आणल्या बद्दल सर्वांचे जाहीर आभार देखील तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी व्यक्त केले आहे.