श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- गौसे आजम या सेवाभावी संस्थेच्या वतीने मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमीत्त बेलापुरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले या ठिकाणी विद्यार्थीना खेळणी वाटप करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक, मुस्ताक शेख, शफीक बागवान, विद्यार्थी कांग्रेस प्रदेश सचिव अक्षय पाटील नाईक, आदींनी मनोगत वक्त केले तसेच गौसे आजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अली सय्यद यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गौसे आजम ही सेवाभावी संस्था ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध सामाजिक उपक्रम राबविते.
आज हज़रत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमीत्ताने एक सामाजिक संदेश देण्याचा संस्थेचा हेतु होता म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता आज खेळणी वाटप करण्याचा प्रमुख कारण म्हणजे शालेय मुले मोबाइल, लैपटॉप विडिओ गेम अशा उपकरणाचा मोठ्या प्रमाणत वापर करत आहेत त्यामुळे त्यांच्या बुद्धिचा विकास तर होत आहे पण शारीरिक विकास होत नाही आज मैदानी खेळच बंद होण्याच्या मार्गावर आहे मैदानी खेळामुळे व्यायामाची आवड निर्माण होते शरीर फिट रहाते त्यामुळे शाळेतुन शारिरीक शिक्षण देण्यात यावे अशी मागणी अली सय्यद यांनी केली आहे यावेळी शालेय पालक समिति चे अध्यक्ष राजू सय्यद, गौसे आजम सेवा भावी संस्थाचे अध्यक्ष सुल्तान शेख, सचिव नौशाद शेख, सदस्य आरिफ शेख,तसेच मुलीच्या शाळेच्या पालक समितीचे अध्यक्ष अजीज शेख सामाजिक कार्यकर्ते शफीक आत्तार,मोहसिन सय्यद रेहान शेख,आदि मान्यवर उपस्थित होते गौसे आजम सेवा भावी संस्थेचे राज्याचे अध्यक्ष सुल्तान शेख यांनी सर्व उपस्थित मान्यवरचा व मराठी शाळेच्या शिक्षक वर्गचे आभार मानले



