spot_img
spot_img

भाद्रपदी बैलपोळा श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आनंदात साजरा.

श्रीगोंदा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा समजणारा जाणारा सण म्हणजे बैल पोळा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. याही वर्षी सर्वत्र साजरा करण्यात आला आहे. भाद्रपद अमावस्या दिवशी भाद्रपती पोळा साजरा केला जातो.

त्यादिवशी बळीराजा आपल्या सर्जा राजाला ( बैल जोडी ) कामाला न जुपता सकाळ पासून तर संध्याकाळ पर्यंत शेतकरी राजा आपल्या बैल जोडी च्या सेवेत पुरेपूर मग्न असतो

शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. अशाप्रकारे शेतकरी राजा बैलांना साज देऊन त्यानंतर गोड पुरणपोळी चा नैवेद्य दाखवला जातो .

मेघराजा ने याही वर्षी चांगल्या प्रकारे हजरी लावल्यानें बऱ्या पैकी बळी राजा सुखावला आहे

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र भाद्रपती पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. शिरसगाव बोडखा येथे डी जे लावून याच प्रमाणे पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये ज्येष्ठांसह चिमुकल्यांनी तरुणांनी मिरवणुकीचा लुटला .

यावेळी चिमुकल्यांसह तरुणवर्ग व ग्रामस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!