spot_img
spot_img

नामको बँक श्रीरामपूर शाखेच्या मार्गदर्शकपदी लबडे,गांधी,छल्लानी, चोरडिया यांची निवड -ससाणे 

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक श्रीरामपूर शाखेच्या मार्गदर्शक पदी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन बँकेच्या भावी वाटचालीस निश्चितच दिशादर्शक ठरणार असल्याचे नामको बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे. श्री विलास काका लबडे, श्री विजय गांधी, श्री पंकज छल्लाणी व श्री संतोष चोरडिया यांची करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक श्रीरामपूर शाखेच्या मार्गदर्शक पदी निवड झाली त्याप्रसंगी ससाणे बोलत होते.

यावेळी नवनिर्वाचित मार्गदर्शक पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या सक्षमीकरणास व भावी प्रगतीस हातभार लावणार असल्याचे सांगत निवडीबद्दल करण ससाणे यांना धन्यवाद दिले. याप्रसंगी मा नगरसेवक आशिष धनवटे, रितेश रोटे,मनोज लबडे, प्रवीण नवले, शाखा अधिकारी चाबुकस्वार, अजय धाकतोडे, योगेश बडदे,संकेत संचेती, नामको बँक श्रीरामपूर शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!