spot_img
spot_img

कै.सौ.केशरबाई तनपुरे पतसंस्थेचे चेअरमन सागर सोमनाथ तनपुरे यांना” सहकार समुद्ध” युवा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा ):- अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघ मर्यादीत अहमदनगर या संस्थेमार्फत दिला जाणारा २०२३ मधील सन्मानाचा “सहकार समृध्द” युवा प्रोत्साहन म्हणून दिला जाणारा पुरस्कारासाठी श्री सागर सोमनाथ तनपुरे यांची निवड स्थैर्य निधीच्या निवड समीतीने केली आहे.

राज्याचे महसुलमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांचे शुभहस्ते व बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा श्रीमान राधेश्यामजी चांडक आणि सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हा उपनिबंधक गणेश जी पुरी , महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्थैर्य निधीचे सुरेश वाबळे साहेब व वसंत लोढा, यांच्या प्रमुख उपस्थितीत व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधी निवड समिती ने दिली आहे. सदर कार्यक्रम हा सहकार प्रशिक्षण केंद्र शिर्डी येथे २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे. सर्व सभासद खातेदार कर्जदार संचालक मंडळ कर्मचारी यांचे खूप खूप धन्यवाद यांच्यामुळेच हा मानाचा पुरस्कार श्री सागर सोमनाथ तनपुरे यांना मिळला आहे. या पुरस्कारासाठी आपण उपस्थित रहावे असे आवाहन केशर उद्योग समूह परिवाराने केले आहे..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!