spot_img
spot_img

शां. ज. पाटणी विद्यालयात भोंडला पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- भारतीय संस्कृतीच्या परंपरा जपण्याचे काम विद्यालयाच्या माध्यमातून यशस्वीरित्या सुरू आहे असे भरत कुंकूलोळ यांनी भोंडल्याच्या पूजनाप्रसंगी प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला बालवाडी विभागाच्या चेअरमन उज्वला चौधरी, बा.ग. कल्याणकर रात्र प्रशालेचे चेअरमन चंद्रकांत सगम, क. जे. सोमैया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन विजय नगरकर, स्कूल कमिटी सदस्य माणिकराव जाधव, भि.रा. खटोड कन्या विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका व स्कूल कमिटी सदस्य चित्रा कडू, विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल भांगरे, पर्यवेक्षिका मंगला डोळस, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष महेंद्र शेटे, हिंदसेवा पतपेढीचे संचालक महेश डावरे, शिक्षक प्रतिनिधी रश्मी कासार व ज्ञानेश्वर लकडे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.

विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय शिंदे व स्मिता शिंदे यांच्या हस्ते शारदा पूजन करण्यात आले. पूजेचे पौरहत्य संस्कृत पंडित दिनेश मुळे यांच्या हस्ते संपन्न झाले. पूजनानंतर पारंपरिक पद्धतीने भोंडला व गरबा नृत्याचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला. याप्रसंगी विद्यालयात भरगच्च रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिती पवार यांनी केले व कार्यक्रमाचे आभार नितीन यशवंत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल गाडेकर, राकेश शिंदे, गणेश नागपुरे, उर्मिला पुजारी, कैलास जेजुरकर, प्रकाश कळमकर, प्रसाद ब्राह्मणे, आदी प्रयत्नशील होते. या उपक्रमाचे पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांकडून कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!