श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा): – आपल्या महाराष्ट्रातील दिवाळी अंकांच्या आगळ्यावेगळ्या परंपरेला एकशे पंधरा अधिक वर्षे होऊन गेली आहेत. ‘आगळीवेगळी’ असा शब्दप्रयोग यासाठी केला कारण विविध भाषा, धर्म आणि तेवढ्याच विविध संस्कृतींनी समृद्ध असलेल्या आपल्या देशात सणावारांची संख्याही तेवढीच आहे. परंतु एवढ्या सर्व सणांमधून महाराष्ट्रातील दिवाळी हा एकमेव सण आहे, ज्या सणात ‘दिवाळी अंकांची’ खास निर्मिती होते. दर वर्षी वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले २५० हुन अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात. हे चित्र इतर कुठल्याही सणांमध्ये पाहायला मिळत नाही. यावर्षी २२५ ते २५० अंक वाचकाच्या भेटीला आले असल्याचे सर्ववृत्तपत्रांचे प्रमुख वितरक मयुर विजय पांडे यांनी दिली.
आता साहित्य व वाचन प्रेमीसाठी मोठ्या प्रमाणात दिवाळी अंक बाजारात आले आहे.त्यामुळे यंदाची दिवाळी या शब्द फराळाने आधिक रुचकर होणार आहे.असे मयुर पांडे यांनी सांगितले.
दिवाळी दोन दिवसावर आली आहे.त्यामुळे बाजारात दिवाळी अंकाची संख्याही वाढत आहे.दिवाळी सणानिमित्त उत्साह आणि आंनदाचे वातावरण आहे.
दिवाळी अंकाचा प्रवास यावर्षी ११६ वे वर्षात प्रदापन करत आहे. वाचक प्रिय, बुध्दवंताची वैचारीक समृध्दी वाढवण्यसाठी भुक भागवण्याचे काम होते ते दिवाळी अंकाने. मराठी वाड्मयीन विश्वात तर दिवाळी अंकानी साहित्यीकाच्या अनेक पिढ्या घडवल्या. अशा दिवाळी अंकाचा प्रवास ११६ वर्षचा होत आहे. महाराष्ट्रात तब्बल तीन हजार अंक दरवर्षी प्रकाशीत होतात. यासोबतच ऑडिओ व्हिज्युअल दिवाळी अंक ही आहे. ई- दिवाळी अंकाना ही मागणी वाढत आहे.असे प्रकारचे २२५ ते २५० प्रकारचे दिवाळी अंक बाजारात दाखल झाले असल्याचे सर्ववृत्तपत्रांचे प्रमुख वितरक मयुर विजय पांडे , मिथुन किशोर पांडे यांनी दिली.
दिवाळी अंक नेहमिच मराठी वाचकांच्या कक्षात रुंदावणारे ठरले आहे. येथील साहित्य हे तत्कालिन प्रगल्भ चळवळीतून नेहमिच समोर येत राहिले. दिवाळी अंकांनी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. आरोग्य, ज्योतिष्य, रहस्यकथा, चित्रपट, पर्यटन,अध्यात्मिक, पाककृती आदी विविध विषयांना वाहलेले एवढेच नव्हे तर विद्यर्थी, मुले,
कामगार, कष्टकरी असे कोणत्याही स्तरातील स्वतंत्र अंक प्रकाशित होऊ लागले आहे. ललित साहित्य, वैचारिक आणि पुरोगामी साहित्याच्या अंकांपेक्षाही आरोग्य,
ज्योतिष्य आणि आध्यात्मिक विषयाच्या दिवाळी अंकांचा खप दरवर्षी वाढत असल्याचे मयुर पांडे यांनी सांगितले.
दैनिकांमधिल लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक सकाळ, लोकमतचादिपोत्सव, केसरी, सामना, पुढारी याच बरोबर साप्ताहिक साहित्यामध्ये चित्रलेखा, लोकप्रभा यांची दिवाळी अंकांत वेगवेगळया विषयांची मांडणी केली आहे. शेतीविषयक अॅग्रोवन, उद्योजक यांचे दिवाळी अंक बाजारात आले आहे.
विनोदी अंकांचा बादशाह आवाज, जत्रा,धमाल धमाका,फिरकी,शामसुंदर हे अंकंही आले आहेत. तसेच आरोग्यासाठी घरचा वैद्य, डायबेटीज मित्र हे अंकही आले आहेत. प्रकाश कुलथे यांचा विनोदी अंक वर्ल्ड सामना तसेच सुमती लांडे यांचे शब्दालय प्रकाशन यांनाही मागणी चांगली आहे.नरेद्र लचके यांचा शितल टाईम्स ,अहमदनगर चे नसीर शेख यांचा विनोदी धमाल धमाका ,या अंकासह सर्व प्रकारचे दिवाळी अंक पांडे बंधु यांच्या स्टॉलवर विक्रिसाठी उपलब्ध आहे.



