spot_img
spot_img

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग योजना ही शेतक-यासाठी महत्वपुर्ण योजना – विलास घुले

लोणी दि.१३( जनता आवाज वृत्तसेवा ):-केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग योजना ही शेतक-यासाठी महत्वपुर्ण योजना असून यांचा फायदा घेत शेतक-यांनी पुढे जातांना यामध्ये सहभागी व्हावे असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्राचे उद्यान विद्या विभागाचे विलास घुले यांनी केले.

कृषि विज्ञान केंद्र,बाभळेश्वर आणि प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत आयोजित प्रशिक्षणात घुले बोलत होते.यावेळी उद्योजकता केंद्राचे उल्हास भाले,केंद्राचे प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख,केंद्राचे शास्ञज्ञ शांताराम सोनवणे,भरत दंवगे,डाॅ.विठ्ठल विखे,कैलास लोंढे, प्रियंका खर्डे, सज्जला लांडगे आदीसह परिसरांतील शेतकरी उपस्थित होते.

डॉ. विलास घुले यांनी भाजीपाला प्रक्रिया व मुल्यवर्धन यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण तज्ञ उल्हास भाले यांनी अन्न प्रक्रिया उदयोगाच्या पतमर्यादा वाढविणे, उत्पादनाचे ब्रॅडिंग मार्केटिंग यांवर मार्गदर्शन केले.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. सुक्ष्म अन्न प्रक्रीया उदयोगांना बँक कर्जाशी निगडीत एकुण पात्र प्रकल्प खर्चाच्या दहा लाख मर्यादेत ३५ टक्के कृषी विभाग यासाठी अनुदान देईल असे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ देशमुख यांनी सांगितले. जास्तीत जास्त शेतक-यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!