spot_img
spot_img

विश्वचषक फायनल क्रिकेट सामना बघा मोठ्या स्क्रीनवर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून क्रिकेट मॅचचे आयोजन

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- विश्वचषक फायनल क्रिकेट सामना बघा मोठ्या स्क्रीनवर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून क्रिकेट रसिकांसाठी खुश खबर असून दिनांक १९ नोव्हेंबर रोजी होणारा भारत – ऑस्ट्रेलिया हा क्रिकेट सामना कोपरगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भव्य स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे.

भारतीय संघ अखंड विजेता बनून अंतिम सामन्यात सामील झालं आहे.तुल्यबळ असणाऱ्या इतर संघाना मात देऊन भारताने विश्वचषक विजयापासून एक पाऊल दूर आहे.अंतिम सामन्यात भारत विजयी होईल ते क्षण डोळ्यात साठवण्यासाठी भारतीय नागरिक आनंदी झाले आहेत.या देशव्यापी भावनेने संजीवनी युवा प्रतिष्ठान उत्सुक झाले असून त्यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना भव्य स्क्रीनवर थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहेत.

युवक,ज्येष्ठ,महिला पुरुष सर्वच देश जिंकला पाहिजे यासाठी आतुर झाले आहेत.मोठ्या संख्येने आपण सर्वांनी या ऐतिहासिक क्षणांचा आनंद घेण्यासाठी उपस्थित रहावे असे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिध्दी माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!