spot_img
spot_img

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप

नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-आज विळद येथे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात खा डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित साधून प्रवरानगर येथील आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वाटप लाभार्थ्यांना यावेळी करण्यात आले.

प्रवरानगर येथील ७००  पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या कार्डचा लाभ घेतला असल्याचे योगेश आहेर यांनी सांगितले

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी २०१८  साली या योजनेचा शुभारंभ केला. ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बीपीएल कुटुंबाला केंद्र शासनाकडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येतो. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना शासनाने निवडलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी खा विखे यांनी सांगितले.

योगेश आहेर, चंद्रकांत आहेर, अतुल आहेर, सलीम पठाण, मोहीम पठाण, सौ ज्योती आहेर आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!