spot_img
spot_img

सामाजिक उपक्रमातून खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांचा प्रवरेत वाढदिवस सामाजिक बाधिकीतून विविध उपक्रम…

लोणी दि.२४( जनता आवाज वृत्तसेवा):-निरोगी आरोग्य,आरोग्य जनजागृती,पर्यावरण संवर्धन,नैसर्गिक शेतीचा संदेश देतांनाच शालेय विद्यार्थ्याना विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण,ऊस तोडणी कामगारांना फराळ वाटपासह विविध सामाजिक उपक्रमातून युवा नेते खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांचा वाढदिवस प्रवरा परिसरात विविध सामाजिक संदेश देत साजरा करण्यात आला.

पायरेन्स लोणीच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तसेच श्रीरामपूर आयुर्वेद प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या सौजन्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आयुर्वेद सर्व रोगनिदान आणि चिकित्सा शिबीर तसेच एकदिवसीय पंचकर्म शिबीर आयोजित करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,संस्थेच्या कार्यकारी अधिकारी डाॅ.सुप्रियाताई ढोकणे,प्रवरा बॅकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक निवृत्ती सांगळे,प्रवरा बॅकेचे संचालक बबनराव काळे,सचिव डाॅ.निलेश बनकर,डाॅ.सतीष भट्टड,डाॅ.महेश क्षिरसागर,

डाॅ.आनंद सोनवणे,डाॅ.महैद्र बोर्डे,डाॅ.प्रज्ञा गाडेकर,डाॅ.स्वप्निल नवले,डाॅ.नेहा मकवाना,डाॅ.विजय कबाडी,डाॅ.अमित मकवाना,डाॅ.मंजिरी मकवाना,डाॅ.दिप्ती गुप्ता,

फार्मसीचे प्राचार्य डाॅ.संजय भवर,डाॅ.रविद्र जाधव,आय.टी.आयचे प्राचार्य अर्जुन आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सौ.शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या देशात फंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंञ आयुष मंञालय सुरु केल्याने आयुर्वेदाचे महत्व वाढत आहे. राजकारण नाही तर समाजकारण हाच विखे पाटील परिवारांचा वारसा असून जिल्हात डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सर्वसमावेश काम होत आहे वयोश्री योजनेतून वयोवृध्द नागरीकांसाठी केलेले कार्य महत्वपुर्ण राहीले आहे.या मोफत शिबीरांतून आरोग्याची जनजागृती होणार आहे.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून समाजकार्याचा वारसा समर्थपणे पुढे जात असून आज पद्यश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील,पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पुर्ण होत असल्याचा आनंद मोठा आहे असे सांगितले.

शिबीरामध्ये संधीवात, मधुमेह, सर्दी आणि खोकला, त्वचा रोग, बाल रोग, स्त्रीरोग,सोरायसीस,पॅराॅलिसिस, दमा,अम्लपित्त, अपचन, मुळव्याध, मुतखडा,वंध्यत्व, मानसविकार, केसांच्या समस्या, भगंदर, बी.पी. ह्रदय रोग, अम्लपित्त, वजन वाढविणे / वजन कमी करणे, आदीसह शिबीरांच्या माध्यमातून सात दिवसांचे औषधे आणि एक दिवसांचे मोफत पंचकर्म सुविधा यांचा लाभ गरजुंनी घेतला.

प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी आणि श्री बालाजी ग्रामीण सांस्कृतिक कला व क्रीडा प्रतिष्ठाण निमगावजाळी तसेच समस्त ग्रामस्थ निमगावजाळी च्या वतीने खा.डॉ. सुजय विखे पाटील यांचे वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि वृक्षारोपण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्रात देखिल खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधत शेतकरी बाधवांसाठी नैसर्गिक शेती काळाची गरज याविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला होतो.यावेळी केंद्राचे प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख,शांताराम सोनवणे,भरत दंवगे यांनी विविध पिकांतील सेंद्रीय शेतीची माहीती दिली.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून शालेय साहीत्याचे वितरणाबरोबरचं उसतोडणी मजुरांना ऊबदार कपडे, दिवाळी फराळांचे वितरण करण्यात आले.यावेळी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. जनसेवा कार्यालय,लोणी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना जीवन आवश्यक औषधे,फळे आणि आयुष्यमान भारत कार्डचे वाटप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले.

खा.विखे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी जिल्ह्यात साजरा झाला.लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या आरोग्य विभाग निधीतून २लाख ९७ हजार ५०० रुपयांची जीवनावश्यक औषधे लोणीच्या ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्द केली.त्याच बरोबर रुग्णालयातील रुग्णांना फळांचेही वाटप करण्यात आले.केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड अनेक नागरिकांना यावेळी वितरित करण्यात आले.सरपंच श्रीमती कल्पना मैड, माजी उपसरपंच गणेश विखे, चांगदेव विखे,अण्णासाहेब म्हस्के,सदस्य दिलीप विखे,रामभाऊ विखे,प्रवीण विखे,भाऊसाहेब धावणे,मयूर मैड,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के,डॉ.हर्षदा म्हस्के,डॉ.जोरी,ग्रामविकास अधिकारी संतोष थिगळे आदींसह सदस्य,ग्रामस्थ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!