नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- मुळा एज्युकेशनच्या कृषि महाविद्यालय, सोनई, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर, वर्शिप अर्थ फाऊंडेशन अहमदनगर तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालयात १८ वर्षे पूर्ण झालेल्या किंवा १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या नवमतदार विद्यार्थ्यांचा मतदार नावनोंदणी कॅम्प संपन्न झाला. नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट फोटो, आई किंवा वडील यांचे इपिक कार्ड (मतदान कार्ड) सोबत घेऊन आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे प्रांताधिकारी सुधीर पाटील,नेवासा तहसीलदार संजय बिराजदार,We फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सचिन कांबळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे नोडल अधिकारी प्रा. संदिप तांबे, महाविद्यालय कॅम्पस अँबेसिटर अजिंक्य लिंगायत,वर्ग प्रतिनिधी आदिती तागड यांच्यासह नव मतदार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी नवमतदारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संदिप तांबे यांनी केले तर अजिंक्य लिंगायत याने आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौरव म्हस्के,ऐश्वर्या परदेशी,अनुष्का मुसमाडे, स्नेहल निबे,यशवर्धन बुधवंत यांनी कष्ट घेतले.



