spot_img
spot_img

राज्यस्तरीय खुली शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा; धाराशिव संघाला विजेतेपद तर पुणे संघ उपविजेता 

लोणी दि.११( जनता आवाज वृत्तसेवा ):- खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी बुद्रुक येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद धाराशिव संघाने तर उपविजेतेपद पुणे संघाने पटकावले.

लोणी येथील पद्मभूषण डॉ.विखे पाटील प्रतिष्ठानने या स्पर्धेचे आयोजन केले होते.९ व १० डिसेंम्बरला पार पडलेल्या या स्पर्धेचे उदघाटन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.राज्यातील अनेक जिल्ह्यातून सुमारे ६४ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.रात्रंदिवस चाललेल्या या स्पर्धेत धाराशिव विरुध्द पुणे ही अंतिम लढत झाली.अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पुणे संघाला पराभूत करीत धाराशिव। संघाने विजेतेपद पटकावले.त्यापूर्वी झालेल्या दोन उपांत्य फेरीच्या सामन्यात धाराशिव संघाने छत्रपती संभाजीनगर संघाचा तर पुणे संघाने राहुरी संघाला पराभूत केले.

विजेत्या धाराशिव संघाला प्रा.भाऊसाहेब विखे व स्वप्नील मुसळे यांच्या वतीने १५ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.उपविजेत्या पुणे संघाला साई व्ही के ट्रॅक्टर्सच्या वतीने ९ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.तृतीय पारितोषिक सुनील आहेर व मयूर विखे यांच्या वतीने रुपये ७ हजार छ.संभाजीनगर संघास तर चतुर्थ पारितोषिक सुरेंद्र लगड यांच्या वतीने रुपये ५ हजार राहुरी संघास देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा.बाळासाहेब विखे,ऍड.सुयोग विखे,सतीश मुसळे, दीपक विखे यांच्या वतीने पाचवे,सहावे,सातवे आणि आठवे पारितोषिक इतर संघांना प्रत्येकी २ हजार १०० रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. सी.एम.विखे यांचे रु.२५१ हे उत्कृष्ट नेटमनचे पारितोषिक पुणे संघाने पटकावले. लोणी बुद्रुक येथील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते ही पारितोषिके देण्यात आली.स्पर्धेला व्हॉलीबॉल प्रेमींनी मोठ्या संख्याने हजेरी लावली.प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!