14.2 C
New York
Saturday, October 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

रेसिडेन्शियल’ विद्यालयाच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा खडांबे येथील ‘श्री शाहू’  मध्ये समारोप..!!

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा) :- अहमदनगर रेसिडेन्शियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलताना अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माननीय रा. ह. दरे म्हणाले की विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनबरोबरच भावी आयुष्यात श्रम प्रतिष्ठा ही महत्त्वाची आहे रेसिडेन्शिअल  महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर श्री शाहू विद्या मंदिर खडांबे खुर्द येथे दिनांक ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर या दरम्यान पार पडले. 

या  श्रमसंस्कार शिबिरात रेसिडेन्शियल विद्यालयाचे ५० विद्यार्थी तर श्री.शाहू विद्या मंदिर चे ७०४ विद्यार्थ्यांनी  एकत्रित पणे ग्रामपंचायत कार्यालय, खडांबे येथे स्थीत वांबोरी रेल्वे स्टेशन आणि  शाळेसभोवतालच्या संपूर्ण परीसरातील  स्वछता मोहीम हाती घेत ती यशस्वी देखील केली.  चार दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिरात  दररोज सायं. विविध विषयांवर आधारित व्याख्याने आयोजित केली त्यात प्रामुख्याने प्रा. बाळासाहेब निमसे – पतलंजली योग समिती, श्री. साठे पी. एस.- समाजसेवा, प्रा. सीताराम काकडे- राष्ट्र निर्मितीसाठी युवकांचे योगदान, प्रा. नानासाहेब हरिश्चंद्रे- आहारविषयक मार्गदर्शन, डॉ. अमोल बागुल- आईची महती, डॉ. नवनाथ वाव्हाळ- वारसा स्थळांचे संवर्धन आदी विषयांवर विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.

9 डिसेंबर  रोजी समारोपाचा कार्यक्रम पार पडला.  खडांबे खुर्द येथील ग्रामस्थ आणि महिला यांनी सर्व सहभागी श्रमिक विद्यार्थी वर्गाला सहकार्य केले.

या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री रा.ह. दरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. पोकळे, श्री शाहू विद्या मुख्याध्यापक जयसिंग नरवडे, पर्यवेक्षक आप्पासाहेब शिंदे,  आदी. शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने  होते. तर खडांबे येथील  कृषी भूषणभूषण सुरसिंगराव पवार, माजी सररपंच प्रभाकर हरिश्चंद्रे, पत्रकार दिपक हरिश्चंद्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंशबापू आवारे,भानुदास कल्हापूरे, गुलाब पवार, आदी. ची उपस्थिती लाभली. तर

कार्यक्रम यशसस्वी होण्याकरिता   एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी जालिंदर पिंपळे व दिपक जाधव यांनी शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश रामफळे,संतोष कार्ले,संदीप बांगर,प्रसाद साठे, सुरेश देशमुख,तुकाराम कोरडे, अर्जुन लंगोटे, मिनीनाथ कुसमुडे,श्रीकांत म्हसे, अरविंद कुमावत,सिकंदर सय्यद,कानिफनाथ दुशिंग, श्रीमती अजंली आसाल,मंजुश्री डंबरे, योगीता म्हस्के, प्रणाली पवार, शैलजा कल्हापुरे, बाळासाहेब मेहेत्रे, अविनाश अमृते आदी.शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच शिक्षकांनी परिश्रम घेतल्याने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.

या कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन राहुल जाधव व संजय रोकडे यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!