16 C
New York
Tuesday, March 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

वाळू धोरणातील त्रृटी दूर करु, पण कोणालाही पाठीशी घालणार नाही- महसूलमंत्री विखे पाटील आधीच्यानी दायित्व निभावले नाही!

नागपूर दि.१३( जनता आवाज वृत्तसेवा ):-वाळू माफियांना रोखण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या वाळू धोरणात काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करून आणखी सुधारणा केल्या जातील. या धोरणात नव्या बाबींचा समावेश करताना कोणाचेही हित जपले जाणार नाही, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील विधानसभेत दिली.

काँग्रेसच्या नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत शून्य प्रहारात महसूल विभागाने घोषित केलेल्या वाळू धोरणाचा मुद्दा मांडला. याला उत्तर देताना विखे-पाटील यांनी वाळू धोरणाला काही ठिकाणी यश आल्याचे तर काही ठिकाणी अपयश आल्याचे मान्य केले. वाळू माफियांना राजकिय पक्षांचे पाठबळ होते. त्यामुळे त्यांचा उच्छाद रोखण्यासाठी आणि त्यांचे सिंडिकेट मोडण्यासाठी आपण धोरण आणले. सरकार बदलले तरी माणसे तीच असतात, असे विखे-पाटील म्हणाले. वाळू धोरणाच्या संदर्भात आमदारांची बैठक घेऊन अडचणी जाणून घेतल्या जातील आशी ग्वाही त्यांनी दिली.

अधिवेशन संपण्यापूर्वी धोरणातील नवीन बाबी समाविष्ट केल्या जातील. सर्वसामान्यांना त्यांच्या घरकुलासाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळावी आणि सरकारी कामे वाळू ऐवजी कॅश सॅण्ड वापरायला परवानगी दिली जाईल, असे विखे-पाटील म्हणाले. याआधी ज्यांच्याकडे याविषयी दायित्व होते ते त्यांनी पार पाडले नाही. जे त्यांना जमले नाही, ते मी करतो. आणि जे मला जमत नाही ते ते करतात, असा टोला विखे-पाटील यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!