राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता येथील सेंट जॉन स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तायक्वांदोच्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये १४ वय वर्ष गटातील संघात चमकदार कामगिरी करत कशीश पावटे या विद्यार्थींनीने गोल्ड मेडल पटकावला आसुन तीची पुणे विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे तर हर्षल मोगले याने सिल्वर मेडिल व शलक शेट्टी हिने ब्राँन्झ मेडल पटकावला आहे.
१७ वय वर्ष गटातील संघात इश्वरी गुंजाळ हीची पुणे विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे आसुन सई लांडबिले श्रृती सोनुळे साहिल वाघमारे यांनी सिल्वर मेडल तर वैष्णवी वाघमारे हिने ब्राँन्झ मेडल पटकावला आहे या सवृ यशस्वी खेळाडुंचे फा. फ्रान्सिंस ओहळ यांनी अभिनंदन करत म्हणाले की खेळामध्ये यश अपयश हे येतच असते अयशस्वी विद्यार्थ्यांनीही खचुन न जाता आपला सराव सुरुच ठेवायाचा आहे यशाचे शिखर सर करण्या आगोदर अपयशाला सामोरे जावेच लागते सेंट जॉन स्कुलचा विद्यार्थीहा इस्ञोत चमकला आहेच आता ऑलिंपिकमध्ये चमकण्याची तयारी तुम्ही ठेवा तुम्हांला आष्टेकर सरांसारखे जेष्ठ व तज्ञ खेळाडु शिक्षक लाभले आहे त्या संधीचे सोने करा असे फा.ओहळ म्हणाले तर या यशस्वी विद्यार्थ्याचे सेंट जॉन स्कुल चे प्रन्सिपल फा. गिलबर्ट डेनिस शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत तर या यशस्वी विद्यार्थ्यांना नंदकुमार आष्टेकर विजय मोगले भावना निमसे यांचे मार्गदर्शन लाभले.