नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून नेवासा शहरातील विविध प्रभागातील रस्ते सभामंडप, पेव्हिंग ब्लॉक कामाचे उदघाटन व बाजारतळ परिसरातील कॉंक्रीटीकरण व दत्त मंदिराच्या सभामंडप लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ. सुनीताताई गडाख यांनी नागरिकांसह महिलांशी सुसंवाद साधला.आमदार गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासा शहरातील अनेक विकास कामांना गती मिळाली असून शहराची आर्थिक उलाढाल कशी वाढेल असा प्रयत्न आमदार शंकरराव गडाख यांनी शहर विकासाच्या दृष्टीने केला असून शहराच्या विकासासाठी आमदार गडाख साहेबांच्या पाठीशी ताकद उभी करा असे आवाहन सौ.सुनीताताई गडाख यांनी यावेळी बोलताना केले.
नेवासा शहरातील लोखंडे गल्ली,संत तुकाराम महाराज मंदिर परिसर,खंडोबा मंदिर परिसर,रामकृष्णनगर, मध्यमेश्वरनगर, रानमळा परिसर,माळी वस्ती,बाजारतळ परिसर व दत्त मंदिर सभामंडप या विविध विकास कामांचे लोकार्पण नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.नेवासा शहरासह विविध प्रभागात झालेल्या विकास कामाच्या लोकार्पण प्रसंगी महिला सुवासिनींनी पंचारती ओवाळून सौ.गडाख यांचे स्वागत केले.
यावेळी सौ.सुनीताताई गडाख यांनी आमदार शंकरराव गडाख यांनी मंजूर करून आणलेल्या कोट्यावधी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.वाड्यावस्त्यांवर झालेले डांबरीकरण, काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांची कामे ,पेव्हिंग ब्लॉकची कामे सभामंडप कामे ही दर्जेदार पध्दतीने करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी बोलताना सौ.सुनीताताई गडाख म्हणाल्या की आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे नेवासा शहर व प्रभागातील विकास कामांना गती देऊन शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमचा शब्द होता तो आता खरा ठरत आहे.
विविध शासकीय इमारतीसह तहसील व न्यायालयाच्या प्रांगणातील तसेच मार्केट कमिटीसमोरील गाळ्यांची विकास कामे ही आमदार गडाख यांनी केलेल्या प्रयत्नामुळे झाली असून यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे.यामुळे होणारी मोठी आर्थिक उलाढाल ही आपल्याच फायदयासाठी होणार असल्याने मुलाबाळांचा संसार ही कसा चांगला होईल यासाठी ही आमदार गडाख यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.नेवासा तालुक्याच्या विकासासाठी व शहराच्या उत्कर्षासाठी आपली संघटनात्मक ताकद आमदार गडाख साहेबांच्या पाठीशी राहू द्या त्यांना पाठबळ देऊन बळ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी झालेल्या विविध विकासात्मक कामाच्या लोकार्पण प्रसंगी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप,बाळासाहेब वाघ,नगरसेवक फारूकभाई आतार,संजय सुखदान,रणजित सोनवणे,दिनेश व्यवहारे,अंबादास ईरले,संदीप बेहळे,सचिन नागपुरे,जितेंद्र कु-हे,राजेंद्र मापारी,दिलीपराव जामदार,राजेंद्र घोरपडे,प्रा.देविदास साळुंके,मुळा कारखान्याचे संचालक नारायण लोखंडे, अँड.बापूसाहेब गायके, रामभाऊ केंदळे,अँड. प्रदीप वाखुरे, अँड.रमेश पाठे,गणेश दारुंटे,हारुणभाई जहागीरदार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.नगराध्यक्ष सतीश पिंपळे यांनी आभार मानले.