राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):-दूध भेसळ व वाळू तस्करी ही समाजाला लागलेली कीड आहे याचे समुळ उच्चाटन केल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही वाळू माफिया निस्तानाबूत करण्याचा संकल्प केल्यानेच शासनाने वाळू धोरण सुरू केले आहे हे धोरण आम्ही नक्कीच यशस्वी करून दाखवू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की तालुक्यातील टाकळीमिया येथील टाकळीमिया विविध कार्यकारी सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार चंद्रशेखर कदम अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती ॲड. सुभाष पाटील जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे तालुक्याचे सहाय्यक निबंधक दीपक पराये जिल्हा बँकेचे विकास अधिकारी गोरक्षनाथ मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी बोलताना नामदार विखे यांनी सांगितले की हा ऐतिहासिक क्षण टाकळीमिया सोसायटीसाठी आहे जुन्या जाणत्या लोकांनी सहकार उभा केला त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून हा गौरव केला गेला पाहिजे केंद्राने सहकार मंत्रालय उभे करून सहकाराला समृद्ध करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे सरकार आणखी समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत येत्या काळामध्ये सहकार चळवळीमध्ये मोठे परिवर्तन घडवून येणार आहे त्यातून सहकारी संस्था सक्षम होणार आहेत या परिवर्तनासाठी सहकारी संस्थांनी सज्ज राहणे गरजेचे आहे भारताची अर्थव्यवस्था मोदी साहेबांमुळे मजबूत होत आहे अनेक गुंतवणूकदार देशामध्ये गुंतवणूक करत आहेत शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहे हे सर्व होत असताना दूध भेसळीची व वाळू तस्करीची मोठी कीड राज्याला लागलेली आहे याचे समोर उच्चाटन केल्याशिवाय शासन स्वस्त राहणार नाही शेतकऱ्याच्या दुधाला २९ रुपये भाव व अधिकचा शासनाने दिलेले ५ रुपयाचे अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे यामध्ये खाजगी दूध संस्थांना देखील कसा समावेश करून शेतकऱ्यांना दिलासा देता येईल याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आम्ही घेतलेले वाळू धोरण नक्कीच यशस्वी करून दाखवू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, जुन्या जाणत्या लोकांनी सहकार वाढवण्याचे काम केले त्यातूनच शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवल्या त्यामुळेच टाकळीमिया विविध कार्यकारी सोसायटी १०० वर्षात उत्तम काम करू शकलेले आहे या संस्थां नसत्या तर शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकली नसती जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांना पतपुरवठा करण्याचे काम सुरू आहे सहकाराला जास्तीत जास्त बळ देण्याचे काम देखील जिल्हा बँक करत आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू संदर्भात घेतलेला निर्णय व दुधा संदर्भात घेतलेला निर्णय हा सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे दुधाचे अनुदान हे खाजगी दूध संकलन संघाला मिळणे देखील गरजेचे आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी ट्रांसफार्मर उपलब्ध करून देण्याची विनंती देखील त्यांनी यावेळी केली.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम अँड. रावसाहेब करपे यांचे देखील भाषण झाले कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन सुरेश करपे व्हॉइस चेअरमन रमेश निमसे कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन शामराव निमसे ज्येष्ठ नेते आसाराम ढुस उत्तमराव म्हसे तान्हाजी धसाळ सरपंच लीलावती गायकवाड उपसरपंच सुवर्णा करपे केशव शिंदे निखिल चौरे रवींद्र म्हसे गणेश भांड दीपक पठारे अर्जुनराव पानसंबळ राजेंद्र साबळे सुरसिंगराव पवार राजेंद्र गायकवाड दत्ता कवाणे राजेंद्र देवकर आदिसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर करपे यांनी केले आभार केशव शिंदे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोसायटीचे सर्व संचालक अधिकारी पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.