9.9 C
New York
Wednesday, November 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

अहमदनगर महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागातील सात विद्यार्थ्यांची कॅम्प्स इंटरव्यूमध्ये निवड 

नगर( जनता आवाज वृत्तसेवा ):- अहमदनगर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागात ‘किरण अकॅडमी ‘ सी एस आर प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात आला. यामध्ये संगणकशास्त्र विभागाच्या सात वि‌द्यार्थ्यांची निवड झाली.

निवड प्रक्रिया १२ व १३ जानेवारी, या दोन दिवसात घेण्यात आली. यामध्ये २३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. निवड प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. अॅप्टीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, प्रोग्राम, मशिन टेस्ट पर्सनल इंटरव्यू या चार फेऱ्या घेण्यात आल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनी मोफत ट्रेनिंग देणार आहे.

यामध्ये बी एससी (संगणकशास्त्र) चा अनिकेत शिंदे व श्वेतल बोडके, बी. सी.ए (सायन्स) चा रिफत बागवान, बी बी.ए. ( ८ कॅम्प्युटर ऑपलिकेशन) चा शुभम गुंजाळ, देवास्मित घोष, एम.एस.सी (संगण शास्त्र) ची भाविका संकपाळ, एम. एस. सी. (कॅम्प्युटर ऑप्लकेशन) ची सानिया खान यांची निवड आलेली आलेला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!