spot_img
spot_img

एक रुपयात विमा योजनेची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र राज्य देशात एकमेव-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राहाता दि.१० (जनता आवाज वृत्तसेवा):-एक रुपयात विमा योजनेची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र राज्य देशात एकमेव ठरले आहे.शासन योजनांचा लाभ नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी आता अधिकार्यांनी सुध्दा लोकापर्यत पोहचावे असे आवाहन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी तालुक्यातील रामपूरवाडी न.पा.वाडी शिंगवे येथे नागरीकांच्या भेटी घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शासकीय योजनांची माहीती दिली.तहसिलदार अमोल मोरे गटविकास अधिकारी पठारे उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड जलसंपदा विभागाचे महेश गायकवाड बांधकाम विभागाचे अभियंता धापटकर यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की संपूर्ण राज्यात शासन आपल्या दारी उपक्रम सुरू आहे.याचा उद्देश फक्त लोकांची शासन दरबारी अडकलेली काम मार्गी लागावी हाच आहे.या उपक्रमातून सरकार आणि सामान्य नागरीक यांच्यातील दरी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात मोठ्या तक्रारी होत्या.यासाठी राज्य सरकारने स्वताचीच पीक विमा योजना सुरू केली असून अवघ्या एक रुपयात पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.यापुर्वी कंपन्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आता अर्थिक नूकसान झाले.मात्र राज्य सरकारने यामध्ये मोठी भूमिका घेवून शेतकऱ्यांना दिलासा देणारी विमा योजना तयार केली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
मागच्या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती.पण अंमलबजावणी केली नाही.राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे.ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही त्यांच्या कागदपत्रातील त्रृटी अधिकाऱ्यांनी दूर करून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या.
 शासकीय योजनांचा लाभ नागरीकांना मिळाला पाहीजे.समाजातील शेवटच्या माणसाला त्याच्या हक्काचे लाभ मिळावे यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येवू नये.आता सर्वच मंत्री या उपक्रमातून लोकांमध्ये जात आहे.अधिकाऱ्यांनी देखील आता लोकांपर्यत पोहचले पाहीजे.
महसूल विभागाच्या माध्यमातून वाळूचे सर्वकष धोरण कार्यान्वित झाले.आता रात्रीची वाळू वाहतूक बंद झाली.दिवसा कायदेशीरपणे वाळू वाहतूक सुरू आहे.ट्रॅक्टरमधून वाळू वाहतुकीला परवानगी दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
राहाता तालुक्यातील बहुतांशी गावातील मोजणीचे प्रकरण मार्गी लागत आहे.जून पर्यत प्रलंबित प्रकरण मार्गी लागतील.रोव्हर तंत्रज्ञानाची मोठी मदत यासाठी झाली.भविष्यात मोजणीचा अर्ज दाखल झाल्यापासून पंधरा दिवसात निकाली काढण्यासाठीचे धोरण घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
शेतशिवार रस्ते पानंद रस्त्यांच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणाचेही अतिक्रमण असले तरी गंभीरतेने कारवाई करण्याच्या सूचना देवून याबाबत मलाही कोणी फोन करु नका.हे रस्ते पावसाळ्यापुर्वी मोकळे करण्यासाठी महसूल यंत्रणेने तत्परता दाखवावी आशा सूचना विखे पाटील यांनी दिल्या.
बंद पडलेला गणेश कारखाना सुरू करण्याचे दायित्व आपण दिखवले.भविष्यातही कारखाना चांगला चालण्यासाठी आपले प्रयत्न राहातील.पण आज निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलेले कारखाना कोण चालवणार हे सांगायला तयार नाहीत.आम्ही बसू,विचार करू,ठरवू असे चालत नाही.भूमिका स्पष्ट असली पाहीजे.जेव्हा कार्यक्षेत्रातून ऊस नेत होता तेव्हा कारखाना आपला वाटला नाही का ?असा प्रश्न विखे पाटील यांनी व्यक्त केला.आज कारखान्याच्या निमित्ताने तुमच्या समोर येणारेच गणेश कारखाना म्हणजे सहकाराला झालेला कॅन्सर असल्याचे म्हणत होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!