spot_img
spot_img

निवृत्तीनाथ महाराज दिंडीने सहकार पंढरी हरीनामाने दुमदुमली पंढरीची वारी…शासन आपल्या दारी उपक्रमामुळे वारकरी समाधानी

लोणी दि.१०( जनता आवाज वृत्तसेवा ):-मुखी हरीनामाचा जयघोष …आणि लाडक्या विठूरायांची मनी आस असलेल्या भक्तांचा महामेळा अर्थात निवत्तीनाथ पायी दिंडीचे शनिवारी सकाळी लोणीत आगमन झाले अन अवघी सहकार पंढरी भक्तीमय झाली.

मजल दरमजल करत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून पंढरपूरकडे निघालेली विठूरायाच्या दिंडीचे महसुल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावतीने लोणी येथील श्री राम मंदीर या ठिकाणी भक्तीमय वातावरण स्वागत करण्यात आले जवळपास वीस ते २५ हजार भाविकांचा लवाजमा सोबत विठ्ठलाचे भजन… टाळ मृदुंग गजर …कपाळी केशरी गंध …देवा तुझा मला छंद…भगवी पताका असा हा भक्तीचा सागर सकाळी दाखल झाला आणि हरीनामाने भक्तीमय झाला. गोगलगांव मुक्कामी असणारी ही दिंडी सकाळी लोणीत येतांच लोणी खुर्द,लोणी बुद्रुक आणि बाभळेश्वर येथे भाविकांची सेवा करतांना हम सब एक है ची प्रचिती भाविकांनी दिली माऊली चहा घ्या..माऊली फराळ घ्या…नाष्टा करा अशी विनंती यानिमित्ताने तरुणाईसह भजनी मंडळ करत होते.लोणी पोलिसांसह सर्वच जण आज या भक्तीसागरांत तन मन धनाने सहभागी झाले होते.हजारो वर्षाची परंतरा असलेल्या या दिंडीत वारक-यांची दुसरी अन तिसरी पिढीचा सहभाग आहे.अनेक वाहनांसह ४५ दिंड्याचा सहभाग,पाणी पुरवठा,आरोग्य पथक,पोलिस पथक या बरोबरचं वेगवेगळ्या समित्या असा हा भक्तीचा पण केवळ माऊली म्हणतं एकमेकांची काळजी घेणारे जिवांभावाची आपली माणसे अशी दिंडी पाहताक्षणी क्षणभर का होईना यांत सहभागी होण्याची आस हाच अनुभव अनेकांनी आज घेतला.आज ही दिंडी राजुरी या ठिकाणी मुक्कामी असणार आहे.

 पालखीचे सोहळ्याचे अध्यक्ष निलेश महाराज गाढवे,पालखी मानकरी मोहन महाराज बेलापूरचर,बाळकृष्ण महाराज टावरे!जयंत महाराज गोसावी,सोपान महाराज जतमालकर!नारायण काका मुढाल,राहुल महाराज सांळुखे,नवनाथ महाराज गांगुर्डे आदीसह हजारो भाविक सहभागी झाले आहे.यावेळी दिंडी प्रमुखाचा सत्कार करतांनाच महाप्रसादांचे ही वाटप करण्यात आले.
पंढरीची वारी… शासन आपल्या दारी
   प्रशासनाने यावर्षी भाविकाांकडे लक्ष दिले आहे.यावर्षी सुरुवात असली तरी येणा-या काळात सर्वसुविधा मिळतील. .दिंडीला सेवा देण्याचे काम शासन करतांना दिसत आहे. .
 – राहुल महाराज सांळुखे दिंडी              (विश्वस्त)
सोलापूर आणि नगरचे पालकमंञी म्हणून महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील हे वारीसाठी चांगले काम करत आहेत. नगरच्या बैठकीत यांवर चर्च झाली आणि नगर जिल्हात प्रवेश केल्यानतंर यांची प्रचिती देखिल येत आहे.यावर्षी शासनाचा सहभाग आणि नियोजन याबाबत समाधानी आहोतं.त्यांनी सुचविलेल्या उपाय योजनामुळे दिंडीचा प्रवास सुखकर होईल.
     – निलेश महाराज गाढवे
दिंडी अध्यक्ष निवृत्ती महाराज पायी दिंडी सोहळा
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!