कोल्हार, दि. २५( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृती प्रित्यर्थ व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्य जीवनगौरव पुरस्कार २०२४ सालचा ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री. विठ्ठलराव लहानुजी बेद्रे गुरुजी व शिक्षिका सौ. कांता विठ्ठलराव बेद्रे यांना ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक माननीय आमदार श्री. लहुजी कानडे व नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
जगद्गुरू स्वामी श्री नरेंद्रचार्य महाराजांचे निस्सीम भक्त व जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायाचे अनुयायी असलेले सेवानिवृत्त शिक्षक श्री व सौ बेद्रे दांपत्य यांनी सलग ३५ वर्ष अध्यापनाचे पवित्र कार्य ग्रामीण भागामध्ये केले असून त्यांना विविध पुरस्काराने वेळोवेळी सन्मानित देखील करण्यात आले आहे. शांत, संयमी व सुसंस्कृत व आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले बेद्रे दांपत्य यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन संयोजकाच्या वतीने सदर पुरस्कार प्राप्त करण्यात आला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीपराव सांगळे, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. वंदनाताई मुरकुटे, पत्रकार श्री. प्रकाश कुलथे, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, डॉ . वसंत शेंडगे आदी उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री मा. नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील याचबरोबर अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.