लोणी दि.२५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-सूर्यभान पाटील तांबे अँड सन्स हिंदुस्तान पेट्रोल पंप चिंचपूर येथे आज द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य असे मोफत नेत्रदान तपासणी शिबिर पार पडले शिबिरामध्ये सुमारे 150 हून अधिक रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व रक्तदाब तपासणी डॉ. स्मिता गायकवाड व डॉ .अभिजीत गायकवाड यांनी केली व अल्प दरात मोतीबिंदू व पडद्याची शस्त्रक्रिया करणार असल्याचे यावेळी डॉ.गायकवाड यांनी सांगितले
याप्रसंगी विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलासनाना तांबे पाटील, रंगनाथ पाटील विखे, प्रवरा सहकारी बँकेचे संचालक गीताराम तांबे पाटील, गजाबा तांबे पाटील, श्रीरंग तांबे पाटील,चिंचपूर सोसायटीचे व्हाईस चेअरमन संभाजी तांबे,सोसायटीचे संचालक हौशीराम तांबे पाटील, माजी सरपंच गीताराम पवार, शंकरराव तांबे, शांताराम तांबे,भूषणदादा विखे पाटील, लक्ष्मीकांत आसावा, गणेश खेंडके,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.




Total Users : 611910