यशवंत सेना अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार १० जून २०२३ रोजी माऊल संकुल झोपडी कॅन्टीन येथे मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक दिला जाणार आहे. डॉ. बिडगर यांनी नुकतेच केरळचे महामहिम राज्यपाल डॉ अरिफ महमंद खान यांचे हस्ते महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अभ्यास हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील धनगर समाजाचा शौक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक विकास या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एचडी पदवी प्राप्त केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील धनगर समाजाचा शौक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक विकास या विषयावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची एम.फील पदवी प्राप्त केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील धनगर समाजाचा शौक्षणिक व राजकीय विकास या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मायनर संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. अनेक विषयावर त्यांनी प्रबोधनपर व्याख्याने दिलेली आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये त्यांनी संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहे. पुरस्कार मिळल्याबद्दल राज्याचे महसुल, ना राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदिप दिघे यांनी अभिनंदन केले आहे.



