त्यानुसार कसाळ यांनी सभापती पदासाठी अर्ज भरला. त्यावर माजी सभापती , विद्यमान संचालक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी सूचक तर राजेंद्र दौंड यांनी अनुमोदक म्हणून सहया केल्या . तसेच उपसभापती पदासाठी खंबरे यांचे अर्जा वर माजी सभापती विद्यमान संचालक एडवोकेट अनिल मडके यांनी सुचक तर अशोक मेरड यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या आहेत . दोघांचेच अर्ज आल्याने व उपस्थितव उपस्थित १७ संचालकांनी लेखी दिल्याने अर्ज दाखल करण्याच्या वेळेच्या मुदतीच्या आत निवडणूक निर्णय अधिकारी लकवाल यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली .
शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी एकनाथ दिनकर कसाळ तर उपसभापती पदी गणेश बाबासाहेब खंबरे यांची बिनविरोध निवड
शेवगाव प्रतिनिधी:-नुकत्याच झालेल्या बाजार समिती शेवगाव बाजार समिती सभापती व उपसभापती निवड ही बिनविरोध झाली आहे. चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले बंधू कडून बंद पाकीट ज्ञानेश्वरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे यांचे कडे आल्यावर ते त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात उपस्थित सर्व संचालकासमोर उघडले . त्यात या दोघांची नावे होती .
घुले बंधूनी अपेक्षेनुसार तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागाचा समन्वय साधत पूर्व भागातील अंतरवलीचे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते ,खरेदी विक्री संघाचे माजी सभापती एकनाथ कसाळ यांची सभापती पदी तर पश्चिम भागातील ढोरसडे अंत्र्याचे युवा कार्यकर्ते गणेश खंबरे यांची उपसभापती पदी वर्णी लावली आहे,
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे १८संचालक सदस्य असून शेवगाव दंगल प्रकरणी जाकीर कुरेशी हे सचालक अटकेत असल्याने ते सोडून सर्व १७ संचालक उपस्थित होते . अधिकृत निवडी जाहीर झाल्यानंतर काकासाहेब नरवडे , संजय कोळगे तसेच एड . अनिल मडके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .त्यानंतर सर्व संचालक मारुतराव घुले जिनिंग प्रेसिंग वर गेले . तेथे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी उभयतांचा सत्कार केला .यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ,ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे , ज्ञानेश्वरचे संचालक बबनराव भुसारी, अंबादास कळमकर तसेच नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. घुले बंधूंनी येणाऱ्या विधानसभा मोर्चाबांधणी आत्ताच चालू केली आहे.



