spot_img
spot_img

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापती पदी ज्ञानेश्वर गोंदकर व उपसभापती पदी आण्णासाहेब कडू यांची निवड

राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती ज्ञानेश्‍वर गंगाधर गोंदकर यांची तर उपसभापती आण्णासाहेब भाऊसाहेब कडू यांची बिनविरोध झाली आहे.

राज्याचे महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील ही बाजार समिती राज्यात अग्र्रणी आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच होवुन विखे पाटील यांच्या एकहाती सत्ता सभासदांनी दिली आहे. काल नुतन संचालक मंडळाची नुतन पदाधिकारी निवडीसाठी बैठक सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब खेडकर हे होते. यावेळी निवडणूक प्रकिया पार पाडण्यात येवुन सभापती पदासाठी व उपसभापती पदासाठी अनुक्रमे गोंदकर व कडू यांचे दोघांचे अर्ज आल्याने या दोघांची निवड बिनविरोध करण्यात आली. 
यावेळी संजय पाटील, सचिव उध्दव देवकर, विखे पाटील यांचे स्विय सहायक प्रमोद राहाणे अदिसह संचालक मंडळातील सदस्य ज्ञानेश्‍वर गोंदकर, आण्णासाहेब कडू, विजय कातोरे, संतोष गोर्डे, दत्तात्रय गोरे, ज्ञानदेव चौधरी, बाबासाहेब शिरसाठ, मिना निर्मळ, रंजना लहारे, दिलीप गाडेकर, राजेंद्र धुमसे, जालिंदर गाढवे, राहुल धावणे, सुभाष गायकवाड, शांताराम जपे, सचिन कानकाटे, निलेश बावके, बाबासाहेब कांदळकर अदि उपस्थित होते.
निवडीनंतर सभापती ज्ञानेश्‍वर गोंदकर, व उपसभापती आण्णासाहेब कडू यांचा सत्कार करण्यात आला. तर सर्व संचालक मंडळाचा सत्कार यावेळी करण्यात आला. ना. विखे पाटील यांचे स्विय सहायक प्रमोद राहाणे यांनी ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल संचालक मंडळाचे तसेच निवडणूक यंत्रणेचे ना. विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी गणेश चे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक मधुकर कोते, माजी संचालक दिगंंबर कोते, शिवाजी गोंदकर, माजी उपसभापती वाल्मिकराव गोर्डे, माजी संचालक किरण दंडवते, ओमेश जपे,े कानिफ बावके, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश बावके, अस्तगाव चे माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे, नवनाथ नळे, ज्ञानदेव गोर्डे, राजेंद्र पठारे, सागर गोर्डे, राजेंद्र तांबे, विजय गोंदकर, विलास रोहोम, बापुसाहेंब लहारे, भिमराज निर्मळ, गोपिनाथ गोंदकर, दशरथ तुपे, किरण वाबळे, राजेंद्र कोल्हे, अनुप कदम यांचेसह कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
{राहाता बाजार समिती ना. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अग्रगण्य आहे. या बाजार समितीत शेतकरी हिताला महत्व दिले जात आहे. या बाजार समितीचा नावलौकिक चांगला आहे. यापुढेही आपण व आपले संचालक मंडळ बाजार समितीचा कारभार चांगलाच करतील. विखे पाटील यांनी आम्हाला सगळ्यांना बाजार समितीवर संधी दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.}
 ज्ञानेश्‍वर (आबा) गोंदकर
 सभापती
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!