लोणी, प्रतिनिधी:- लोणी तळेगांव रोड वर गोगल गाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट जखमी झाले नितिन भनगे यांना रस्त्याने जात असताना काळवीट जखमी अवस्थेत पाहिले व त्यांनी वन्य जीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.
माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी नगरच्या उपवणसरक्षक सौ सुवर्णा माने,कोपरगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा पाटील , वनपाल संजय साखरे, वनरक्षक प्रियांका चव्हाण यांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के, प्रियांका चव्हाण,प्रमोद विखे , अजय बोधक , आर्यन गायकवाड गोगलगाव ला जावून काळवीट पुढील वैद्यकीय उपचारासाठी ताब्यात घेतले.
त्याला लोणीच्या शासकिय रोपवाटिकेत आणले व काळवीटावर पशुसंवर्धन अधिकारी डॉ. महेश भालेराव, डॉ. मुसळे यांनी उपचार केले. त्यानंतर त्याला प्राणीमित्र विकास म्हस्के यांच्या निसर्ग संगोपण केंद्रात दाखल करण्यात आले.



