माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ मन की बात, या कार्यक्रमामुळे एफएम रेडिओ जगभरात प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच माय एफएम व बिग एफएम चॅनल कडून प्रतिवर्षी देशभरात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी देशभरातील सुमारे दहा व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ विखे पाटील हॉस्पिटल ( नगर ) येथील कर्करोग तज्ञ डॉ रोहन बी खर्डे यांना गौरविण्यात आले.
कोल्हार-भगवतीपूरचे भूमिपुत्र डॉ रोहन खर्डे यांना एकाच वेळी दोन पुरस्कार प्रदान कर्करोग क्षेत्रात अमूल्य कामगिरी
कोल्हार प्रतिनिधी : माय एफएम व बिग एफएम कडून दिला जाणारा प्रतिवर्षांचा पुरस्कार कोल्हार-भगवतीपूर येथील डॉ विखे पाटील हॉस्पिटलमध्ये मध्ये कार्यरत असलेले डॉ रोहन भास्कर खर्डे यांना कर्करोग तज्ञ म्हणून रुग्णसेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मिळाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण अ.नगर येथे करण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हार-भगवतीपूरच्या मनात आणखी एक तुरा रोवला गेला.
‘ जय मल्हार, फेम सिने अभिनेते देवदत्त नागे व ‘ तुझ्यात जीव रंगला, फेम सिने अभिनेत्री धनश्री काडगांवकर यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मार्च व एप्रिल मध्ये दोन टप्प्यात दोन पुरस्कार देऊन त्यांच्या कर्करोग या आजारावर उत्कृष्ट उपचार तज्ञ म्हणून दोन्ही चॅनल कडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ विखे पाटील रेसिडेंशीअल व कँसर क्षेत्रात काम करणाऱ्या दोन सहकारी डॉक्टरांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
कोल्हार-भगवतीपुर येथील भूमिपुत्र व डॉ विखे पाटील हॉस्पिटल नगर मध्ये कार्यरत असलेल्या डॉ रोहन खर्डे यांना एकाचवेळी दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.



