माळवाडगाव (प्रतिनिधी) :मुठेवाडगाव ग्रामपंचायतच्या सरकारी जागेवर व गायरान वरती अनाधिकृतपणे बांधकाम करून अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दोन सदस्य अपात्र करण्याच्या निकाला विरुद्ध सत्ताधारी गटाने नाशिक उपआयुक्त श्री रमेशराव काळे साहेब यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यात अखेर दोन सदस्य आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सदस्य अपात्रेचा तोच निकाल कायम ठेवून गोरख सजन जाधव व सौ उज्वला आदिनाथ दिघे यांना अपात्र ठरवण्यात आले होते त्याविरुद्ध नाशिक आयुक्तच्या निकाला विरोधात औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती अखेर तेथेही या दोन सदस्यांना अपात्र करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे.
मुठेवाडगाव ग्रामपंचायत 2021 ते 2025 या कालावधीसाठी 15 जानेवारी 2021 रोजी निवडणूक होऊन कानडे गटाचे विश्वनाथ मुठे यांच्या नेतृत्वाखाली पाच जागा व विखे मुरकुटे गटाचे नेतृत्व सोसायटीचे चेअरमन व भाजपचे तालुका उपाध्यक्ष डॉ शंकरराव मुठे व कारेगाव भागचे उपाध्यक्ष शिवाजी मुठे यांच्या नेतृत्वाखाली चार जागा निवडून आल्या होत्या त्यानंतर सत्ताधारी गटाने प्रथम सौ.लंकाबाई दिनकर मुठे यांच्याविरुद्ध विश्वनाथ नानासाहेब मुठे यांनी ग्रामपंचायत बाकी असल्याची तक्रार दाखल करून अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे विरोधी गट शांत न बसता विरोधी गटांनी सुरेश दिनकर रूपटक्के यांनी गोरख सजन जाधव यांच्या विरुद्ध तर शिवाजी लक्ष्मण मुठे यांनी सौ.उज्वला आदिनाथ दिघे यांनी अनुक्रमे गायरान व ग्रामपंचायत च्या जागेवर अतिक्रमण केले आहे या दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर एक वर्ष तारखा चालून जिल्हाधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांच्या मार्फत शहानिशा करून अहवाल मागितला होता. गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष दोन्ही सदस्याच्या घरी जाऊन पंचा समक्ष जबाब नोंदवला होता. दोन्ही सदस्य गायरानच्या व ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करून राहत असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयला लेखी स्वरूपात दिला होता. तर लंका दिनकर मुठे यांच्या विरुद्ध ग्रामसेवकांनी लंका मुठे त्यांच्याकडे ग्रामपंचायतची बाकी नसल्याचा अहवाल दिल्यामुळे विरोधी विखे मुरकुटे गटाच्या बाजूने तिन्ही निकाल लागल्यामुळे सत्ताधारी गटाने नाशिक उपआयुक्ता श्री रमेशराव काळे साहेब कडे जिल्हाधिकारी यांच्या 22/08/2022 रोजी च्या आदेशाविरुद्ध दोन अपील दाखल केले होते त्यानंतर 12/12/2022 रोजी आयुक्तांनी सत्ताधारी गटाचे दोन सदस्य अपात्र बाबद जिल्हाधिकारी यांचा निकाल कायम ठेवून जाधव व दिघे यांना अपात्र करण्यात आले असल्याचा निकाल दिला
त्या निकालाच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये स्टे मिळवण्यासाठी 2/3/2023 रोजी याचिका दाखल केली होती. परंतु विरोधकांनी अगोदरच कॅव्हेट दाखल केल्यामुळे त्यांना स्टे मिळाला नाही. त्यानंतर 6/3/2023 व,5/4/2023 दोन तारखा झाल्यानंतर मुठेवाडगाव ग्रामपंचायत ची पोटनिवडणूक जाहीर झाली त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा हायकोर्टात धाव घेऊन निवडणुकीला स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर त्यांना 21/4, 25/4, 26/4 तारखा नंतर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून नंतर हायकोर्टाने गटविकास अधिकारी यांचा अहवाल मागितला व सर्व पुराव्याची शहानिशा करून गोरख सजन जाधव व उज्वला आदिनाथ दिघे यांना निवडणुकीला स्थगिती न देता नाशिक आयुक्तचा निकाल कायम ठेवून दोघेही सदस्य अपात्र असल्याचा निकाल 27/4/2023 दिल्यामुळे सत्ताधारी कानडे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सत्ताधारी गट अल्पमतात आला आहे त्यांची सदस्य संख्या 5 वरून आता 3 वरती पोचली आहे तर विरोधी गटाची संख्या ४ ही कायम राहिली आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते सदर विरुद्ध बाजूच्या वतीने एडवोकेट विवेक तारडे व एडवोकेट अमोल संभाजी धोंडे यांनी काम पाहिले.
सदर वरील दोन्ही रिक्त झालेल्या सर्वसाधारण स्त्री व अनुसूचित जाती या दोन जागेसाठी जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान 18 मे 2023 रोजी होत आहे.
विखे मुरकुटे पॅनलच्या सर्वसाधारण स्त्री जागेसाठी संगीता शंकरराव मुठे व अनुसूचित जाती या जागेसाठी किशोर विश्वास साठे यांच्या विरुद्ध कानडे गटाच्या निर्मला शहारम मुठे व सोमनाथ रामभाऊ रूपटक्के यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होत आहे.



