spot_img
spot_img

कोपरगाव मध्ये 6 लाखाचा गुटखा पकडण्यात यश. स्थानिक गुन्हा शाखेकडून कारवाई

कोपरगाव  (प्रतिनिधी ):-  कोपरगाव तालुक्यातील गुटख्याची अवैद्य रित्या वाहतूक करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांकडून 6 लाखाच्या गुटखा मुद्देमालासह जप्त केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी आहे की, कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील पोल्ट्री फार्म जवळ एका छोट्या टेम्पो मधून गुटख्याची अवैद्य रित्या वाहतूक करणाऱ्या एकावर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल दिनांक सात रोजी रात्रीच्या वेळी कारवाई केली आहे. या कारवाईंमध्ये पोलिसांना एका छोट्या टेम्पोचं  (mh-15-hh-4001) क्रमांकाच्या टेम्पोवर धाड टाकून विविध प्रकारच्या गुटख्या असा एकूण सहा लाख 11 हजार रु. मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी अहमदनगर येथील स्थानिक गुण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांनी रितेश सुभाष गादिया ( रा. कोळपेवाडी  ) याच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी फरार झाला असून याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. नगर जिल्ह्यामध्ये  सर्व तालुक्यांमध्ये सरसपणे गुटखा विक्री चालू आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून व अन्न भेसळ प्रशासनाकडून कुठलाही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे स्थानिक  लोकांमध्ये नाराजीचे सूर उठत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!