18.6 C
New York
Sunday, September 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

दोन कुटुंबातील हाणामारीत एका महिलेचा जागीच मृत्यू, तरुण जखमी  तालुक्यातील वळदगाव शिवारातील घटना

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- तालुक्यातील वळदगाव निपाणी वडगाव शिवेवर राहणाऱ्या दोन कुटुंबात झालेल्या वादातून एका महिलेचा खून झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणास उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते. ही हाणामारी एका नाजूक कारणामुळे झाली असल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू होती.

तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात काल रात्री अकरा वाजेच्या दरम्यान दोन कुटुंबात काही शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. एका गटाने कोयता कुऱ्हाडीच्या सहाय्याने दुसऱ्या कुटुंबास मारहाण केली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरुणाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते. या भांडणाचे नेमके कारण समजू शकले नाही, परंतु काही नाजूक कारणातून हा प्रकार झाले असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!