श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ खैरी निमगाव येथे रास्तारोको करण्यात आला.
शाहा पांचाळे ता.सिन्नर जि. नाशिक येथे सुरू असलेल्या १७७ व्या गंगागीरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात महंत रामगिरी महाराज यांनी बांग्लादेश येथील परिस्थितीचे वर्णन करताना मांडलेल्या बाबी या धर्मग्रंथात नमुद असुन रामगिरी महाराजाना जाणिवपुर्वक त्रास देण्याचे सुरू असलेले षडयंत्र तातडीने थांबवण्यात यावे.
या मागणीसाठी आज शनिवारी सकाळी श्रीरामपूर – पुणतांबा रस्त्यावरील खैरी निमगाव येथील ओढ्याजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
बांग्लादेश येथील परिस्थितीचे वर्णन करताना महंत रामगिरी महाराज यांनी मांडलेल्या सर्व बाबी या धर्मग्रथांत नमुद केल्या. मात्र महाराजांना त्रास देण्याचे षडयंत्र तातडीने थांबवण्यात यावे. महाराजांना संरक्षण मिळावे. तसेच समाजात तेढ वाढेल असे कृत्य करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी ग्रामदैवत वाघाई देवी जवळ सर्व हिंदु बांधवांची बैठक झाली. त्यानंतर श्रीरामपूर – पुणतांबा रस्त्यावरील खैरी निमगाव येथील ओढ्याजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी निवेदन स्विकारून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.