लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषि शास्ञ संस्था लोणी, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ वाजता पद्यश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य आणि शेतकरी दिनानिमित्त कृृषि प्रदर्शन,कृृषि चर्चासञ आणि शेतक-यासाठी शिवार फेरीचे आयोजन प्रवरा कृृषिशास्ञ संस्था लोणी येथील लोणटेकच्या प्रांगणात करण्यात आले आहे अशी माहिती संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी दिली.
याविषयी माहिती देताना डॉ. उत्तमराव कदम म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या या शेतकरी शिवार फेरीच्या माध्यमातून या संस्थेच्या प्रक्षेञावर राबविण्यात आलेले विविध तंत्रज्ञान,कृषिच्या विद्यार्थ्यीनी फुलवलेली भाजीपाला शेती, शेतीपूरक व्यवसाय,रोपवाटीका, मल्चिंग वर घेतलेले वांगी, कोबी, फुल शेती याविषयीची माहिती तज्ञ प्राध्यापकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष उपलब्ध होणार आहे. कृषी विज्ञान केंद्र,बाभळेश्वर येथील विविध विविध उपक्रम जैविक शेती, जैविक औषधे आणि खते, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, एकात्मिक कीड नियंत्रण भाजीपाला आणि फळबाग लागवड तंत्रज्ञान,गांडूळ शेती, शेतीपूरक व्यवसाय यांची प्रत्यक्ष पाहणी या शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना होणार आहे.
त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजना आणि शेती औवजारे,पाणी व्यवस्थापन,विविध क्षेत्रातील कंपन्यांचे स्टॉल,चारा पिकांसाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर,ग्रो बॅगव्दारे वेलवर्गीय भाजीपाला लागवड याशिवाय कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी माहिती देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरीचे अधिष्ठता डाॅ.दिलीप पवार, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, तालुका कृृषि अधिकारी आबासाहेब भोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांच्यासह परिसरातील प्रयोगशील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.तरी शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृषीशास्ञ संस्था,लोणी, कृषी विज्ञान केंद्र,बाभळेश्वर आणि कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कृषि शेतकरी शिवार फेरीतून शेतक-यांच्या मुलांनी शिक्षणांसोबतचं प्रत्यक्ष कृृृतीतून फुलवलेली शेती,पाणी व्यवस्थापन,खत व्यवस्थापन आणि मार्केटींग तंञ,ग्रो बॅग पध्दत तंञाचा वापर करुन घेतलेल्या वेलवर्गीय भाजीपाला आदीची पाहणी शिवार फेरीतून करता येणार आहे.शिवाय मधुमक्षिका पालन,मशरुम लागवड,पुरक व्यवसाय,शेती तंञज्ञान याविषयी चर्चासञ होणार आहेत.