संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर शहरातील वाडेकर गल्लीत राहणाऱ्या पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी साडेचार वाजताच्या सुमारास उघडकीस आली दोन वर्षापूर्वी वाडेकर दापत्त्यांच्या अवघ्या सोळा वर्षीय लहान मुलाने घरातच तर पाच दिवसांपूर्वी २१ वर्षीय मोठ्या मुलाने पुण्यात गळफास घेत आत्महत्या केली अवघ्या दोन महि न्यात वाडेकरांचे आखे कुटुंबाच संपले असल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे गणेश मच्छिंद्र वाडेकर वय 55 व त्यांची पत्नी गौरी गणेश वाडेकर वय रा वाडेकर गल्ली संगमनेर ता संगमनेर जि अहमदनगर असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
संगमनेर नगरपालिकेत लिपिकपदावर सेवेत असलेले मात्र काही महिन्यांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतलेले गणेश वाडेकर व घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात परिचारीका म्हणून कार्यरत असलेल्या गौरी वाडेकर यांनी आपल्या राहत्या घरात छताला गळफास बांधून आत्महत्या केली आहे याच दापत्त्यांच्या पुण्यात शिक्षण घेणारा मोठा मुलगा श्रीराज गणेश वाडेकर वय २१ याने तर अवघ्या पाचच दिवसापूर्वी पुण्यातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली होती तर, तर २६ ऑक्टोबर २०२१ ला दोन वर्षांपूर्वी त्यांचा छोटा मुलगा श्रेयस गणेश वाडेकर (वय १६) यानेही वाडेकर गल्ली तील आपल्या राहत्या घरातच गळफास घेत आपले जीवन संपविले होते त्यातच आज मंगळवारी दुपारी सव्वाचार वाज ण्याच्या सुमारास त्या दोन्ही मुलांच्या आई वडिलांनी सुद्धा घरातच गळफास घेऊन आपलेही जीवन संपवले
दोन्ही मुलांच्या झालेल्या आत्महत्यातून आलेले नैराश्य असण्याची दाट शक्यता आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच आसपासच्या नागरीकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली . शहर पोलिसांनी तत्काळ वाडेकर गल्लीत धाव घेतली मात्र तो पर्यंत खूप उशिर झालेलाहोता.यावेळी वाडेकर गल्ली, रंगारगल्ली व चंद्रशेखर चौक या परिसरातील रहिवाशी मोठ्या संख्येने जमा झाले होते. अवघ्या दोनच वर्षात दोन मुलांसह आई-वडिलांनी गळ फास घेवून आपली जीवन यात्रा संपवि ल्याने परिसरासह संपूर्ण शहरातून हळ हळ व्यक्त केली जात आहे.