spot_img
spot_img

गाव भेटीतून नागरिकांशी संवाद साधत ‘विकासाचा श्रीगणेश’ संकल्पनेला प्राधान्य- ना. राधाकृष्ण विखे पाटील

राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- गणेश उत्सवाच्या निमित्ताने महसूल तथा पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाव भेटीतून नागरीकांशी संवाद साधत ‘विकासाचा श्रीगणेश’ संकल्पनेला प्राधान्य दिले आहे. गणेश उत्‍सवाच्‍या या सामाजिक एैक्‍याचे हे वातावरण विकास पर्वाशी जोडण्‍याचा प्रयत्‍न यशस्‍वी केला आहे.

गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व गावामध्ये गणेश मंडळानी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यंदा गणेश उत्सवाचा जोषही चांगला असल्याने प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमाचे आयोजन करून या उत्सवाचा आनंद वाढवला आहे.

मंत्री विखे पाटील यांनी राहाता तालुक्यातील विविध गावात गणेश मंडळाना भेटी देवून ग्रामस्थ, युवक आणि महीलांशी संवाद साधून त्याच्याशी विकास काम तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आहे.

तालुक्यात अद्यापही अपेक्षे प्रमाणे पाऊस झालेला नाही. पण धरणं भरल्याचे समाधान सर्वानाच होते. तालुक्यातील पाण्याची गरज लक्षात घेवून विखे पाटील यांनी ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यांना सोडण्याचे आदेश दिले, या निर्णयामुळे लाभक्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. गावातील पाझर तलाव, तळे आणि बंधारे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे शेवटच्या गावापर्यत पाणी मिळावे यासाठी ना.विखे पाटील यांनी स्वत: आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून काळजी घेतली. या पाण्याचा मोठा दिलासा पिकांना मिळाला असून, पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाल्याचे समाधान या गाव भेटीतील संवादातून व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. अडचण असेल तिथे अधिका-यांना तातडीने सूचना देवून कार्यवाही करण्यास सांगत आहेत.

महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी झालेल्या महीलांचा उत्साह मंत्री विखे पाटील यांच्या स्वागता मध्ये अधिक ठळकपणे दिसून येतो. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का आशी आस्थेने विचारपूस करणा-या मंत्री विखे पाटील यांना लाडक्या बहीणींचा मिळाणारा सकारात्मक प्रतिसाद उत्साही ठरत आहे.

मंत्री विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने आचार्य चाणक्‍य युवा कौशल्‍य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. या योजनेतून ३७ प्रकारचे कोर्सेस सुरु करण्‍यात आले असून, या योजनेत सहभागी होण्‍याचे आवाहन ते गावोगावी युवकांशी संवाद साधताना करीत आहेत. प्रशिक्षणा बरोबरच संस्‍थेच्‍या वतीने युवकांना ६ हजार रुपयांचे मानधन या योजनेतून मिळणार आहे. जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक विकासाच्‍या दृष्‍टीने सुरु केलेली योजना कुशल प्रशिक्षणार्थी घडविण्‍यास महत्‍वपूर्ण ठरणार असल्‍याचा विश्‍वास ते युवकांना देत आहेत.

स्थानिक पातळीवरील रस्‍त्‍यांचा प्रश्न, शेतीशी निगडीत समस्या आशा अनेक प्रश्नाची उकल या गाव भेटीतून विखे पाटील यांनी करण्यास प्राधान्य देत गणेश उत्सवाला विकास प्रक्रीयेशी जोडून दिले आहे. यापुर्वीही मतदार संघात केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजनांची प्रभावी अंमलबजावणी मंत्री विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने झाली आहे.

गणेश उत्‍सवाच्‍या निमित्‍ताने कार्यकर्ते, जेष्‍ठ नागरीक, युवक आणि महिलांना गावात जावून शुभेच्‍छा देता आल्‍या, त्‍यांचे प्रश्‍नही समजुन घेता आले. शासनाच्‍या योजनेतील अडचणीही या संवादातून समोर येतात. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्‍याचे समाधान बहीणींच्‍या चेह-यावर ठळकपणे जाणवले. गणेश उत्‍सवाचे हे सामाजिक एैक्‍याचे वातावरण विकास पर्वाशी जोडण्‍याचा प्रयत्‍न केला.

 -ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

 

 

 

 

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!