शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- माध्यमांनी हे रान उठवलय की एकनाथ शिंदे नाराज आहेत. मात्र ते नाराज असण्याचे काही कारण वाटत नाही. पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल, तो मी मान्य करील अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. शिवाय मुख्यमंत्री पदासाठी आमची पहिली पसंती ही देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, असे मत ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर ना.राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रीय झाले असून लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली; यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कि ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशिर्वाद राहिला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद आहे.
मला दिलेल्या संधीत मी चांगल काम करून दाखवलय. तो विश्वास पुन्हा पक्ष नेतृत्व व्यक्त करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री पदाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनाच आहे. त्यामुळे वेगळ मागण्याचे कारण नाही. पक्ष नेतृत्वाचा माझ्याबद्दल विश्वास असून निश्चितपणे ते चांगली जबाबदारी मला देतील त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. विधानसभेत पराभव झाल्यानंतर एकमेकांवर खापर फोडण्याच काम सुरू आहे. त्यामुळे या पळवाटा शोधण्याचे काम ते करत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जनाधार गमावलाय ते कुठ तरी मान्य करा. उद्धव ठाकेरेंनी मोदी आणि शहा यांच्यावर बेताल विधान केली. एवढ बेताल विधान करणारा मी पाहिला नाही. मुळात त्याचे शासन त्यांना लोकांनी दिले असल्याचे विखे पाटील म्हणाले.
तसेच बच्चु कडूंना महायुती सरकारने पाठबळ दिलं. धोरण मान्य केली, दिव्यांगाची धोरण मान्य केली. त्याच्याशी प्रतारणा करून बच्चु कडू यांनी जो विश्वासघात दाखवला. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामिल करून घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे.