कोपरगाव(जनता आवाज वृत्तसेवा ):- कोपरगाव येथील एका इमारतीमधील सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी लाच मागणारा तलाठी व खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल जेरबंद केले.गणेश वैजीनाथ सोनवणे (वय ४०, तलाठी, कोपरगाव, जि. अहिल्यानगर) व करण नारायण जगताप (वय २८, रा. साई सिटी परिसर, कोपरगाव, जि. अहिल्यानगर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
कोपरगावमध्ये असलेल्या एका इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी तलाठी सोनवणेला देण्यासाठी सहा हजार रुपये तर स्वतःसाठी ५०० रुपयांची मागणी करण जगतापने तक्रारदाराकडे केली होती.या व्यवहाराला तलाठी सोनवणे याची संमती होती.
या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने करण जगताप याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तलाठी सोनवणे व करण जगताप यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे समजते.



